Nashik News : ३२ टक्के नाशिककरांना हवी पार्कींगसाठी जास्त जागा, शिवसेनेकडून वाहतूक सर्वेक्षण अहवाल सादर

Nashik News : ३२ टक्के नाशिककरांना हवी पार्कींगसाठी जास्त जागा, शिवसेनेकडून वाहतूक सर्वेक्षण अहवाल सादर
Published on
Updated on

नाशिक: पुढारी वृत्तसेवा, शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना सुचविण्यासाठी शिवसेने (शिंदे गटा) ने घेतलेल्या आॉनलाईन वाहतूक सर्वेक्षणाचा अहवाल महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांना सादर केला आहे. या अहवालानुसार ३२ टक्के नाशिककरांना पार्कींगसाठी जास्त जागा हवी आहे. तर, २६ टक्के नागरिकांनी रस्ते रुंद करण्याची सूचना केली आहे. (Nashik News)

संबधित बातम्या :

शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस उग्र स्वरूप धारण करत आहे. या समस्येवर तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. शासकीय यंत्रणा या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आपापल्यापरीने प्रयत्नरत आहेत. मात्र व्यापक जनसहभागाशिवाय हा प्रश्न सुटणे अवघड असल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी फेसबुकद्वारे जनमत चाचणी घेतली. वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी काय उपाययोजना करता येतील, यासंदर्भात लोकांची मतं आजमावली. ट्रॅफिक पोलिसांची संख्या व कार्यक्षमता वाढविणे, रस्ते रूंद करणे, पार्किंगसाठी जास्तीत जास्त जागा उपलब्ध करून देणे, वाहन चालकांनी स्वयंशिस्त पाळणे, पब्लिक ट्रान्सपोर्टेशन अधिक सक्षम करणे, दिल्लीच्या धर्तीवर सम-विषम पार्कींग व्यवस्था या पर्यायांवर लोकांनी आपली मतं नोंदविली. त्यानंतर सर्वेक्षणाचा अहवाल बोरस्ते यांनी महापालिका आयुक्तांना सादर केला आहे. (Nashik News)

असा आहे जनमताचा कौल

* पार्किंगसाठी जास्तीत जास्त जागा उपलब्ध करून देणे – ३२ %

* रस्ते रुंद करणे – २६ %

* वाहन चालकांनी स्वयंशिस्त पाळणे – १८ %

* ट्राफिक पोलिसांची संख्या व कार्यक्षमता वाढविणे – ११ %

* पब्लिक ट्रान्स्पोर्टशन अधिक सक्षम करणे – १० %

* दिल्लीच्या धर्तीवर सम-विषम क्रमांकाच्या वाहनांना परवानगी करणे – ३ %

शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शिवसेनेने केलेले वाहतूक सर्वेक्षण महापालिका व पोलीस प्रशासनाला उपयुक्त ठरेल. शासनामार्फतही निधी व अन्य काही उपाययोजनांसंदर्भात मदत केली जाईल.

-अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख, शिवसेना

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news