Nashik Cold : हवेत गारठा निर्माण झाल्याने नाशिककरांना हुडहुडी

फाईल फोटो
फाईल फोटो

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहर-परिसरामध्ये ढगाळ हवामानासोबत पाऱ्यातील घसरण कायम आहे. गुरुवारी (दि.७) किमान तापमानाचा पारा १६.८ अंशावर स्थिरावला. त्यामुळे हवेत गारठा निर्माण झाल्याने नाशिककरांनी हुडहुडी भरली. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये शुक्रवार (दि.८) नंतर थंडीचा कडका वाढले, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Nashik Cold)

नोव्हेंबरच्या अखेरच्या टप्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीनंतर दिवसेंदिवस तापमानात घसरण होत आहे. आधीच ढगाळ हवामानामुळे हवेत गारवा निर्माण होत आहे. त्यातच नाशिक शहराच्या पाऱ्यात गेल्या २४ तासांमध्ये १.८ अंश सेल्सियसची घट झाली. त्यामुळे दिवसभर हवेत गारवा जाणवत होता. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी उबदार कपड्यांसह ठिकठिकाणी शेकोट्यर पेटविल्या जात आहेत. शहरासोबतच ग्रामीण भागालाही थंडीची चाहूल लागली आहे. द्राक्षपंढरी असलेल्या निफाड तालूक्यातील कुंदेवाडीच्या येथील गहू संशोधन केंद्रात १५.५ अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले. वातावरणातील बदलामुळे तालुक्यात गारठा जाणवत आहे. तर पहाटेच्या वेळी पडणाऱ्या दवबिंदुमुळे द्राक्षबागा धोक्यात येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अन्य तालूक्यांमध्येही थंडी जाणवत असल्याने नागरिक हैराण झाले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news