नाशिक : ‘पीएम स्किल रन’ मध्ये ३ हजार विद्यार्थी धावणार, उद्या रंगणार मॅरेथॉन

मॅरेथॉन www.pudhari.news
मॅरेथॉन www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्य शिक्षणावर विशेष भर राहणार आहे. कौशल्य शिक्षणाचा प्रचार-प्रसार आणि शासनाच्या नवनवीन योजना युवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी रविवारी (दि. १७) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पीएम स्किल रनचे आयोजन करण्यात आले आहे. या रनमध्ये आयटीआयचे सुमारे ३ हजार विद्यार्थी धावणार असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक पी. एम. वाकडे यांनी दिली.

संबधित बातम्या :

'पीएम स्किल रन'च्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्र्यंबक नाका येथून ५ किलोमीटरच्या मॅरेथॉनला सकाळी 7 वाजता आमदार देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीत प्रारंभ होणार असून, सातपूर आयटीआय येथे मॅरेथॉनचा समारोप आमदार सीमा हिरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. तालुकास्तरावरही मॅरेथॉन होणार असून, विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार असल्याचे सहसंचालक वाकडे यांनी सांगितले.

'पीएम स्किल रन'मध्ये आर्मी जवानांसह शासकीय आणि खासगी आयटीआय तसेच अनुसूचित जाती प्रवर्गाच्या आयटीआयचे विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. ही मॅरेथॉन खुली असून, १६ वर्षांवरील इच्छुकांना सहभाग नोंदविता येणार असल्याचे सहसंचालक वाकडे यांनी सांगितले. दरम्यान, पत्रकार परिषदेत आयटीआयमधील अभ्यासिका, व्हच्युअल क्लासरूम, ग्रीम जिम, विद्यावेतन तसेच स्वच्छता मोहिमेची माहिती देण्यात आली. यावेळी उपसंचालक रवींद्र मुंडासे, राजेश मानकर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी इंद्रभान काकड, सहायक संचालक बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.

१६,५०० प्रशिक्षणार्थींना पदवी प्रदान होणार

'पीएम स्किल रन'च्या समारोपाप्रसंगी ऑगस्ट २०२३ मध्ये परीक्षेत उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना पदवी प्रदान केली जाणार आहे. नाशिक विभागातील शासकीय आयटीआयच्या १३ हजार, तर खासगी आयटीआयचे साडेतीन हजार विद्यार्थी पदवी स्वीकारणार असल्याचे सहसंचालक वाकडे यांनी सांगितले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news