Minister Narhari Zirwal Viral Video |व्हिडिओमुळे झिरवाळ यांचे मंत्रिपद धोक्यात

Minister Narhari Zirwal Viral Video | झिरवाळ-मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीची चर्चा
Narahari Zirwal controversy
Narhari Zirwal Pudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर अडचणीत सापडलेले असतानाच आता मंत्री नरहरी झिरवाळ यांचाही खासगी व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Narahari Zirwal controversy
Nashik Ashok Kharat Case | खरातच्या भोंदूपणाचे 'प्लास्टिक' पुरावे जप्त! 20 फुटी सापाचा धाक दाखवून करायचा अघोरी विधी

शासकीय निवासस्थानी ते महिलेसोबत (तृतीयपंथी) दिसून येत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने झिरवाळ यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर झिरवाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.

विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्यांची मागणी लावून धरली आहे. नाशिकमधील भोंद्बाबा अशोक खरात प्रकरण आणि व्हिडिओने धुमाकूळ घातला असतानाच मंत्री झिरवाळ यांचा व्हिडिओसमोर आला आहे.

या व्हिडिओमध्ये शासकीय निवासस्थानातील या दृश्यांमध्ये तृतीयपंथी पवन यादव हा झिरवाळ यांच्यासोबत बिछान्यावर बसलेला दिसत आहे. तसेच त्यांच्या शेजारी खाद्यपदार्थ आणि मद्याच्या बाटल्याही दिसून येत आहेत. पक्षाच्या अध्यक्ष-पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाची आग्रही मागणी करणारे झिरवाळ हे पहिले नेते ठरले होते. दरम्यान, याबाबत पक्षांतर्गत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसली तरी, नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

Narahari Zirwal controversy
Ashok Kharat Nashik Case | खरातकडून 'मर्सिडीज' सह पाच कोटींची खंडणी

पक्षांतर्गत वर्चस्ववादातून लक्ष्य

या प्रकरणाची मंत्री झिरवाळ यांना पूर्ण कल्पना असल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झिरवाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन चर्चा केल्याचे समजते.

पक्षात सध्या मंत्रिपदासाठी अनेक जण इच्छुक असून, त्या स्पर्धेतूनच झिरवाळ यांना लक्ष्य केले जात असल्याची चर्चा राजकीय गोटात आहे. या प्रकरणावर अद्याप मंत्री झिरवाळ यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

तिसरा बळी ठरणार का?

या प्रकरणामुळे झिरवाळ यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षाने ही कारवाई केल्यास आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला, तर धनंजय मुंडे आणि अॅड. माणिकराव कोकाटे यांच्यानंतर मंत्रिपद सोडावे लागणारे झिरवाळ हे पक्षाचे तिसरे मंत्री ठरतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news