Ashok Kharat Nashik Case | खरातकडून 'मर्सिडीज' सह पाच कोटींची खंडणी

Ashok Kharat Nashik Case | मर्सिडीज कार 'गिफ्ट' म्हणून बळजबरीने घेण्यास भाग पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ashok Kharat Case
Ashok Kharat Case
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भोंदू अशोक खरात याचा आणखी एक धक्कादायक कारनामा उघडकीस आला असून, पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडून तब्बल पाच कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच मर्सिडीज कार 'गिफ्ट' म्हणून बळजबरीने घेण्यास भाग पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ashok Kharat Case
Nashik Ashok Kharat Case | खरातच्या भोंदूपणाचे 'प्लास्टिक' पुरावे जप्त! 20 फुटी सापाचा धाक दाखवून करायचा अघोरी विधी

फिर्यादी राजेंद्र जासूद (५१, रा. हडपसर, पुणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये त्यांची खरातसोबत ओळख झाली. परदेशात लॉजिस्टिक व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी खरातचा सल्ला घेतला होता. यावेळी 'अवतारपूजा' करण्यासाठी परदेश दौरे करणे आवश्यक असल्याचे सांगत खरातने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खर्च करवून घेतला.

म्यानमार, ग्रीनलँड तसेच अमेरिका दौऱ्यांसाठी लाखो रुपये खर्च करण्यास भाग पाडण्यात आले. याचदरम्यान पुण्यातील शोरूममधून सुमारे ९० लाख रुपयांची मर्सिडीज कार गिफ्ट देण्यासही जासूद यांना भाग पाडण्यात आले. यासाठी त्यांनी कर्ज काढून तसेच रोख रक्कम भरून वाहन खरेदी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Ashok Kharat Case
Anti-Superstition Law | राज्यात जादूटोण्याचे दोन हजार गुन्हे दाखल

दरम्यान, एकूण व्यवहारांमध्ये पाच कोटी रुपयांहून अधिक रक्कम उकळल्याचा आरोप असून, खरातने मीरगाव येथील आलिशान फार्महाउससाठीही मोठा खर्च करवून घेतला. परदेशातून महागडे फर्निचर मागविण्यास भाग पाडल्याचेही समोर आले आहे. प्रकरण उघड होण्याची शक्यता लक्षात घेऊन खरातनेच उलट जासूद यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे भोंदूगिरीच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीचे आणखी एक प्रकरण समोर आले असून, पोलिस तपास सुरू आहे.

भोंदू खरातचा बंदूक परवाना रद्द

भोंदू अशोक खरातचा बंदूक परवाना रद्द करण्यात आला आहे. २०१२ मध्ये त्याला बंदूक परवाना देण्यात आला होता. २०२४ ला त्याची नूतनीकरण करण्यात आले होते. खरातवर होणाऱ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर परवाना रद्द करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news