पुढारी विशेष : निखिल रोकडे, नाशिक
आजच्या डिजिटल युगात प्रेम करण्याची पद्धत बदलली आहे. पूर्वी मैत्री, प्रेम आणि लग्न वाटचाल होत असे. आता मात्र वन नाईट स्टँड, घोस्टिंग, ब्रेड क्रंबलिंग, सिच्युएशशिप यांसारखे नवे शब्द नातेसंबंधांमध्ये वापरले जात आहेत. सोशल मीडिया, डेटिंग अॅप्स आणि सततच्या ऑनलाइन संपर्कमुळे नवीन ओळखी घेणे सोपे झाले आहे. मात्र, या नात्यांमध्ये नेमके प्रेम आहे की, केवळ आकर्षण, याबाबत अनेकदा संभ्रम निर्माण होतो.
आज काही जणांना नात्यात कायमस्वरूपी बांधिलकी नको असते, तर काही जण एकाच वेळी अनेक पर्याय खुले ठेवतात. त्यामुळे नात्यांमध्ये स्पष्टता कमी आणि अपेक्षांचा गुंता अधिक दिसतो. याच प्रकारांपैकी एक म्हणजे 'बेंचिंग रिलेशनशिप'. एखाद्या व्यक्तीशी पूर्णपणे प्रेमसंबंध ठेवायचे नाहीत, पण तिला दूरही करायचे नाही, असे वागणे म्हणजे बेंचिंग.
दुसरी व्यक्ती आपल्याला भविष्यात उपयोगी पडू शकते, या विचाराने तिच्याशी अधूनमधून संपर्क ठेवला जातो. जणू एखाद्या खेळाula मैदानात उतरविण्याऐवजी राखीव जागेवर बसवून ठेवावे, तशी ही परिस्थिती असते. यात एक व्यक्ती आशा बाळगून राहते, तर दुसरी मात्र निर्णय घेण्याचे टाळते.
वन नाईट स्टँड: वन नाईट स्टँड म्हणजे दोन प्रौढ व्यक्तींमध्ये परस्पर संमतीने एका रात्रीपुरते ठेवलेले शारीरिक किंवा लैंगिक संबंध होय. या नात्यात सहसा दीर्घकालीन प्रेमसंबंध किंवा बांधिलकी अपेक्षित नसते.
सिच्युएशशिप: दोन व्यक्तींमध्ये मैत्रीपेक्षा अधिक जवळीक असते. मात्र, त्यांचे नाते नेमके काय आहे, हे स्पष्ट नसते. त्या एकमेकांना भेटतात, बोलतात, वेळ घालवतात. पण, प्रेमसंबंध असल्याचे मान्य करत नाहीत. भविष्यात एकत्र राहायचे की वेगळे व्हायचे, याबाबत स्पष्ट निर्णय नसतो.
बेंचिंग: व्यक्तीला प्रेमसंबंधात पूर्णपणे स्वीकारायचे नाही. पण, तिला दूरही करायचे नाही, अशा वागण्याला बेंचिंग म्हणतात. गरज पडल्यास पर्याय उपलब्ध राहावा, म्हणून त्या व्यक्तीशी अधूनमधून संपर्क ठेवला जातो.
डिंक कपल: डिंक कपल म्हणजे 'डबल इनकम, नो किसर्स' म्हणजे पती-पत्नी किंवा जोडीदार दोघेही नौकरी किंवा व्यवसाय करून पैसे कमावतात. मात्र, मुलांना जन्म न देण्याचा किंवा मुलांचे संगोपन न करण्याचा निर्णय घेतात.
घोस्टिंग: एखाद्या व्यक्तीशी नियमित बोलल्यानंतर अचानक कोणतेही कारण न सांगता संपर्क तोडणे म्हणजे घोस्टिंग. फोन उचलणे बंद करणे, मेसेजला उत्तर न देणे किंवा सोशल मीडियावरून गायब होणे, असे प्रकार यात घडतात.
रेंट अ बॉयफ्रेंड: एखाद्या व्यक्तीला पैसे देऊन ठराविक वेळेसाठी बॉयफ्रेंडसारखी सोबत मिळविणे म्हणजे रेंट अ बॉयफ्रेंड. अशा व्यक्तींसोबत गप्पा मारणे, फिरायला जाणे किंवा एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे, अशा गोष्टी केल्या जाऊ शकतात.
ब्रेड क्रंबलिंग: एखाद्या व्यक्तीला अधूनमधून मेसेज करणे, कौतुक करणे किंवा प्रेम असल्याचे संकेत देणे. पण, प्रत्यक्ष नात्याबाबत कोणטाहि निर्णय न घेणे म्हणजे ब्रेड क्रंबलिंग.
सुगर मम्मी आणि सुगर डॅडी: आर्थिकदृष्ट्या सक्षम महिला किंवा पुरुष दुसऱ्या व्यक्तीला पैसे, महागड्या भेटवस्तू किंवा इतर सुविधा देतात, अशा संबंधांसाठी या संज्ञा वापरल्या जातात. त्याबदल्यात सहवास किंवा परस्पर संमतीने ठरवलेली जवळीक अपेक्षित असू शकते.
एस्कॉर्ट गर्ल: पैशांच्या मोबदल्यात एखाद्या व्यक्तीला सामाजिक कार्यक्रमात, प्रवासात किंवा अन्य प्रसंगी सोबत देणाऱ्या महिलेला काही संदर्भात एस्कॉर्ट गर्ल म्हटले जाते.
नात्यांचे हे नवे प्रकार समजून घेताना प्रत्येक व्यक्ती किंवा जोडीदार एकाच चौकटीत बसते, असे समजणे चुकीचे ठरेल. कालानुसार नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तरी विश्वास, आदर, प्रामाणिकपणा आणि स्पष्ट संवाद यांचे महत्त्व आजيही कायम आहे. नात्यात स्वातंत्र्य असणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी समोरच्या व्यक्तीला संभ्रमात ठेवणे योग्य नाही.
प्रेमाच्या नात्यात दोघांचीही इच्छा, संमती आणि भावना महत्त्वाच्या असतात. एखाद्या नात्याला कोणते नाव दिले आहे, यापेक्षा त्या नात्यात दोघांनाही सुरक्षितता, आदर आणि समाधान मिळते का, हे अधिक महत्त्वाचे आहे. कारण नात्यांचे ट्रेंड बदलत राहतील. पण, मन समजून घेणारी व्यक्ती, विश्वास आणि भावनांची आधार यांची गरज कायम राहणार आहे.
आजच्या रिलेशनशिपमध्ये बेंचिंग, घोस्टिंग आणि ब्रेड क्रंबलिंग-सारखे नवे ट्रेंड दिसत आहेत. बेंचिंगमध्ये एकाच वेळी अनेկना नात्याची आशा दाखवली जाते. ब्रेड क्रंबलिंगमध्ये अधूनमधून प्रेम, आपुलकी दाखवून भावना स्पष्ट केल्या जात नाहीत, तर घोस्टिंगमध्ये कोणतेही स्पष्टीकरण न देता, अचानक संपर्क तोडला जातो. या वागण्यामुळे समोरच्या व्यक्तीला संभ्रम, असुरक्षितता आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. नात्यांमध्ये प्रामाणिकपणा, स्पष्ट संवाद आणि भावनांचा आदर महत्त्वाचा आहे.
- मीनाक्षी जगदाळे, कौन्सिलर
नात्यांमध्ये परस्पर विश्वास, भावनात्मक बांध आणि प्रामाणिकपणा अत्यंत आवश्यक आहे. सोशल मीडियाच्या जमान्यात तात्पुरत्या रिलेशनशिपमध्ये क्षणिक आकर्षण निर्माण होते. मात्र, अनेkada आकर्षण आणि आर्थिक अपेक्षा ही त्यामागіл कारणे असू शकतात. अशा नात्यांमध्ये फसवणूक आणि गैरकृत्ये घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तरुण पिढीने भावनात्मक गुंतवणूक करताना सावध राहून नात्यांची संयता पडताळणे आवश्यक आहे.
- कीर्ती हिरे, अॅडव्होकेट