Nashik District Drought | नाशिक जिल्ह्यात दुष्काळावर मात करण्यासाठी 64,527 विकास व जलसंधारण कामांचा भव्य आराखडा तयार

Nashik District Drought | ६१,२१५ कामांतून जलसंधारण; मालेगाव तालुका आघाडीवर, जलताराची २० हजार कामे प्रस्तावित
Drought
DroughtPudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासह ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ६४ हजार ५२७ कामांचा जिल्हास्तरीय आराखडा तयार केला आहे. यामध्ये तब्बल ६१ हजार २१५ कामे जलसंधारणाची असून, उर्वरित ३ हजार ३१२ कामे इतर दुष्काळ अनुषंगिक स्वरूपाची आहेत.

Drought
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदावरून उबाठा आणि काँग्रेसमध्ये वाढले मतभेद

विशेष म्हणजे, सर्वाधिक २२ हजार ५ कामे मालेगाव तालुक्यात प्रस्तावित असल्याची माहिती समोर आली असून, व्हीबी जी राम जी योजनेअंतर्गत अधिकाधिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबरोबरच ग्रामीण भागातील मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्याचा या आराखड्याचा उद्देश आहे.

त्यासाठी माती बंधारे, नालाबांध, सिमेंट बंधारे, दगडी व भूमिगत बंधारे, गॅबियन बंधारे, नदी व तलाव पुनरुज्जीवन, शेततळी, वनतळी, सलग समतल चर (सीसीटी), शोषखड्डे, विहीर पुनрभरण आणि पावसाचे पाणी साठवण्याच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच जलसाठ्यांमधील गाळ काढण्यावरही भर दिला जाणार आहे.

पाणी, शेती आणि पशुधनासाठी उपाययोजना

जलसंधारणासोबत भात खाचर विकास, मजुगी व वृक्षलागवड, फळबाग व तुती लागवड, गांडूळ खतनिर्मिती, गोऱ्हांचे गोठे, जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था आणि रस्ते व इतर पायाभूत सुविधांची कामेही नियोजनात घेतली आहेत. या कामांमुळे पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी जमिनीत मुरण्यास मदत होईल.

Drought
Trimbakeshwar Drought | नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये 97 टक्के गावांची पंचनामे प्रक्रिया पूर्ण

तालुकानिहाय नियोजनात मालेगाव तालुका आघाडीवर असून, दिंडोरीत ५ हजार २७६, त्र्यंबकेश्वर- ५ हजार १६५, बागलाण- ४ हजार ७००, सिन्नर- ४ हजार १५० आणि येवल्यामध्ये ४ हजार ८५ कामे प्रस्तावित आहेत. नांदगावमध्ये ३ हजार ७०७, कळवणमध्ये ३ हजार ४१५, पेठमध्ये ३ हजार २६७, देवळ्यात २ हजार ३५५, निफाडमध्ये १ हजार ७६४, सुरगाण्यात १ हजार ४८९, इगतपुरीत १ हजार ४५४, चांदवडमध्ये ९८७, तर नाशिक तालुक्यात ६७० कामांचा समावेश आहे.

मालेगाव तालुक्यातील २२ हजार ५ कामांपैकी २० हजार कामे जलताराची आहेत.
दिंडोरीत शेततळी, नदी पुनरुज्जीवन व गाळ काढणे, तर त्र्यंबकेश्वरमध्ये नदी पुनरुज्जीवन, तुती लागवड आणि जलतारा यांसारख्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. व्हीबी जी राम जीसह अन्य योजनांच्या माध्यमातून ही कामे राबविल्यास स्थानिक मजुरांना गावातच रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news