Nashik Kumbh Mela | कुंभमेळ्याचा खोटा प्रचार हाणून पाडू : अनिकेत शास्त्री

Nashik Kumbh Mela | महंत अनिकेत शास्त्री महाराज : ५०० पानांचा अहवाल सरकारला सादर करणार
Simhastha Kumbh Mela Nashik
Simhastha Kumbh Mela NashikPudhari News Network
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कुंभमेळा अकबराने सुरू केला हा खोटा प्रचार करून काही डावे विचारवंत सनातन धर्माला बदनाम करत आहेत. या अपप्रचाराचे खंडन करण्यासाठी साधू-महंत एकत्र आले आहेत. कुंभमेळा ५०० वर्षांपूर्वीचा नसून अनादी, प्राचीन आहे. त्याचे दाखले वेद, पुराणे आणि शिवपुराणात आढळतात.

Simhastha Kumbh Mela Nashik
Nashik Drought Scarcity | नाशिक जिल्ह्यात धरणे भरली, पण शेतकरी चिंताक्रांत! वगळलेल्या 5 तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती

हा ऐतिहासिक व शास्त्रीय पुरावा समाजासमोर आणण्यासाठी ५०० पानांचा सर्वसमावेशक अहवाल केंद्र व राज्य शासनाला सादर केला जाणार असल्याचे प्रतिपादन महंत अनिकेत शास्त्री देशपांडे महाराज यांनी केले.
दोन दिवसीय 'ज्ञानकुंभ २०२६' संमेलनात ते बोलत होते. व्यासपीठावर महंत भक्तिचरण दास महाराज, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले, सुनील घनवट, लक्ष्मण सावजी, आकाश छाजेड आदी उपस्थित होते.

महंत अनिकेत शास्त्री देशपांडे महाराज म्हणाले, ५० वर्षांत सनातन धर्मावर झालेले अन्याय दूर होत असले तरी शासनाने ध्वजारोहण व कुंभ विधी पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडण्यासाठी ठोस पावले उचलावीत. वृंदावनधाम येथील श्री अक्षय्यानंद महाराज म्हणाले की, कुंभमेळा नियोजनात काही उणिवा जाणवत आहेत.

यासाठी सर्व आखाडे, महंत आणि प्रशासनाने समन्वय साधून तोडगा काढणे गरजेचे आहे. अ. भा. संत समिती, धर्म समाज, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख संदीप सोनजे यांनी विविध १२७ संप्रदायांचा यावेळी परिचय करून दिला.

Simhastha Kumbh Mela Nashik
Land Scam SIT | 'नाशिक डायोसेशन ट्रस्ट'च्या जमीन व्यवहारांची एसआयटी चौकशी

या प्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी भूमिका मांडली. या प्रसंगी श्रीकाशी विद्वद धर्म परिषद, अखिल भारत हिंदू महासभा, आखाडा परिषद, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ, नाशिक पुरोहित संघ, आध्यात्मिक आघाडी, सनातन संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महिलांचा स्वतंत्र आखाडा नाही : भगवान बाबा:

त्र्यंबकेश्वर आखाडा परिषदेचे महामंडलेश्वर महंत शंकरानंंद सरस्वती महाराज (भगवान बाबा) म्हणाले की, परंपरेनुसार केवळ तेरा आखाड्यांचे अस्तित्व असून, नवीन आखाडा तयार होऊ शकत नाही, त्याला शासन-प्रशासन मान्यता देऊ शकत नाही. शाहीस्नानाची वेळ व काळ निश्चित असतो. सनातन परंपरेत लिंगभेद मानला जात नाही; विद्यमान आखाड्यांमध्येही महिलांचा सहभाग असतो. त्यामुळे महिलांसाठी वेगळा आखाडा होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news