जळगाव : लग्नाचे आमिष दाखवून प्राध्यापिकेवर बलात्कार 

जळगाव : लग्नाचे आमिष दाखवून प्राध्यापिकेवर बलात्कार 

जळगाव : अमळनेर येथे प्राध्यापक असलेल्या शिरूर तालुक्यातील प्राध्यापिकेचे दोन वर्षांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथील युवकाबरोबर प्रेम संबंध जुळले. या भेटीगाठीतून लग्नाचे आमिष देऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवले. कुणालाही काही सांगू नको नाहीतर जीवे ठार मारेल अशी धमकी देऊन संशयित पसार झाला.  या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथील इंदूज टावर कंपनीमध्ये नोकरी असलेला संशयित आरोपी सचिन नाना पाटील (शिरूर तालुका, अमळनेर) याचे व अंमळनेर तालुक्यातील शिरोळ येथील प्राध्यापिका असलेल्या 29 वर्षीय महिलेचे प्रेम संबंध दोन वर्षापासून होते. त्याने प्राध्यापिकेस लग्नाचे आमिष दाखवून व अमळनेरला वारंवार भेटण्यास येऊन शारीरिक संबंध ठेवले. (दि. 17) प्राध्यापिकेचा वाढदिवस असल्याने पळून जाऊन लग्न करण्याचे ठरविले व त्यानुसार (दि. 19) धडगाव येथे गेले मात्र लग्नास नकार देऊन प्राध्यापिकेला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन (दि. 20)  तळोदा निझर गुजरात रोडवरील हॉटेल वर एकटीला सोडून संशयित तरुण पसार झाला. पीडित प्राध्यापिकेने अमळनेर पोलिसांत संशयित आरोपी संजय पाटील यांच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंद केला.  पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news