Keshav Maharaj : केशव महाराज मैदानात येताच सुरु झालं ‘राम सिया राम’ गाणं, त्यावर केएल राहुलचा मजेदार संवाद, व्हिडिओ व्हायरल | पुढारी

Keshav Maharaj : केशव महाराज मैदानात येताच सुरु झालं 'राम सिया राम' गाणं, त्यावर केएल राहुलचा मजेदार संवाद, व्हिडिओ व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७८ धावांनी पराभव करत वनडे मालिका २-१ ने जिंकली. मात्र, या सामन्यात सर्वाधिक चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे केएल राहुल आणि केशव महाराज यांच्यातील संवाद. खरं तर, गुरुवारी (दि.21) भारताविरुद्धच्या तिसर्‍या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज फलंदाजीसाठी आला तेव्हा ‘राम सिया राम’ हे गाणं वाजवण्यात आलं. फलंदाजी असो की गोलंदाजी, महाराज जेव्हा जेव्हा ऍक्शनमध्ये असतो तेव्हा हे गाणे वाजवले जायचे. महाराज गोलंदाजी करत असतानाही असेच झाले. (Keshav Maharaj)

केशव महाराजांनी फलंदाजी करताना ‘राम सिया राम’ हे गाण मैदानावर सुरु झालं. यावेळी महाराज आणि भारताचा यष्टीरक्षक आणि कर्णधार केएल राहुल यांच्यात एक मजेदार संवाद झाला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावेळी राहुल म्हणाला महाराज, तुम्ही जेव्हाही मैदानात येता तेव्हा डीजे ‘राम सिया राम’ हे गाणं वाजवतो. यावर, दक्षिण महाराज होय अशी अशी प्रतिक्रिया दिली. (Keshav Maharaj)

मॅचमध्ये काय घडलं?

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केली. यामध्ये भारताने 50 षटकात आठ गडी गमावून 296 धावा केल्या. संजू सॅमसनने 114 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 108 धावा केल्या. त्याच्याशिवाय टिलक वर्माने ७७ चेंडूंत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५२ धावा केल्या. तर रिंकू सिंगने २७ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३८ धावांची खेळी केली. गोलंदाजीमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून ब्युरॉन हेंड्रिक्सने सर्वाधिक तीन बळी घेतले. तर नांद्रे बर्जरने दोन गडी बाद केले. लिझार्ड विल्यम्स, व्हियान मुल्डर आणि केशव महाराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

प्रत्युत्तरात आफ्रिकेचा संघ 45.5 षटकांत 218 धावांवर गारद झाला. अर्शदीपने नऊ षटकांत 30 धावा देत चार बळी घेतले. अर्शदीपशिवाय आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. दक्षिण आफ्रिकेसाठी टोनी डी जॉर्जीने 87 चेंडूत 81 धावा केल्या. तर, कर्णधार एडन मार्करामने 41 चेंडूत 36 धावांची खेळी केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Keshav Maharaj (@keshavmaharaj16)

हेही वाचा :

Back to top button