जळगाव : मोटर सायकल चोरांना आळा घालण्यात पोलीस अपयशी ठरल्याने एसपींची नाराजी

जळगाव : मोटर सायकल चोरांना आळा घालण्यात पोलीस अपयशी ठरल्याने एसपींची नाराजी

जळगाव- पुढारी वृत्तसेवा – जिल्ह्यात मोटर सायकल चोरीच्या घटना नियमित होत आहे. याला आळा घालण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरलेले आहे. मोटरसायकल चोरट्यांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेपासून स्थानिक पोलिसांपर्यंत अपयश आलेले आहे. याबाबत पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर एसपींनी नाराजी व्यक्त केली. यावरच लवकर काम करणार असून चोरट्यांच्या मुस्क्या आवळण्यात येतील असे पत्रकार परिषदेमध्ये एसपींनी सांगितले.

सरपंच पदाच्या उमेदवाराने जिल्ह्यामध्ये व जिल्ह्याबाहेर गेल्या पाच वर्षात अनेक घरफोड्या केल्या व त्याने त्या घरफोड्यांची कबुली दिली.  याबाबत (दि. 22) रोजी सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे यावर ते म्हणाले की, स्थानिक गुन्हे शाखेपासून स्थानिक पोलीसांना मोटर सायकल चोरट्यांना आळा घालण्यात अपयश आले आहे. याबद्दल पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी नाराजी व्यक्त केली व लवकरच याबाबत मोटरसायकल चोऱ्यांच्या मुसक्या आवळण्यातयेतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news