काँग्रेस फक्त एका कुटुंबाची गुलाम : PM मोदींचा घणाघात | पुढारी

काँग्रेस फक्त एका कुटुंबाची गुलाम : PM मोदींचा घणाघात

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राजस्‍थान विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्‍प्‍यात आला आहे. राज्‍यात २५ नोव्‍हेंबर रोजी मतदान होणार आहे. उद्‍या सायंकाळी प्रचार थंडावणार आहे. भाजप आणि काँग्रेसच्‍या प्रचार सभांचा धुराळा उडाला आहे. आज सागवाडामधील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्‍लाबोल केला.

पंतप्रधान नरेंद मोदी म्‍हणाले की, राजस्थानमधील प्रत्येक सरकारी भरतीमध्ये काँग्रेस सरकारने घोटाळा केला आहे. काँग्रेसचे नेते आणि त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये असा उद्योग आहे की त्यांची मुले अधिकारी झाली आणि तुमची मुले निवडकपणे बाहेर फेकली गेली. त्यामुळे अशा लोकांना राजस्थानच्या भूमीतून बाहेर काढावे लागेल. काळ्या कृत्यांच्या लाल डायरीची पाने उघडली जात आहेत त्यात काँग्रेस सरकारचे काळे सत्य आहे. काँग्रेसचे हे कुशासित सरकार बदलण्याची संधी लोकशाहीने दिली आहे. ही संधी जाऊ देऊ नका, असे आवाहनही त्‍यांनी केले.

काँग्रेस फक्त एका कुटुंबाची गुलाम बनली आहे

मोदींचा हमीभाव काँग्रेसच्या सर्व खोट्या आश्वासनांपेक्षा जास्त आहे. जिथे काँग्रेसची आशा संपते, तिथून मोदींची हमी सुरू होते, असा टोला लगावत ज्याचा काँग्रेसने आपल्या दशकभराच्या कारकिर्दीत विचारही केला नाही, ते तुमच्या सेवकाने गेल्या १० वर्षांत देशवासीयांच्या चरणी अर्पण केले आहे. काँग्रेस पार्टी कोणाचीही नाही ती फक्‍त एका कुटुंबाची गुलाम झाली आहे, अशी घणाघाती टीकाही त्‍यांनी केली.

‘काँग्रेस साफ करा आणि अत्याचार आणि भ्रष्टाचारमुक्त करा. केंद्राच्या प्रत्येक योजना वेगाने बनविण्यासाठी काँग्रेसला राजस्‍थानमधून हटविणे गरजेचे आहे. तुमची स्वप्ने हे माझे संकल्प आहेत, मला ते पूर्ण करायचे आहेत, त्यामुळे सर्व अडथळे दूर करा, असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

हेही वाचा : 

 

Back to top button