तुळजापूर : मराठा आरक्षणासाठी जळकोटमध्ये तरूणाने जीवन संपवले | पुढारी

तुळजापूर : मराठा आरक्षणासाठी जळकोटमध्ये तरूणाने जीवन संपवले

अणदूर, पुढारी वृत्‍तसेवा तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील हत्तेनगर भागात राहणाऱ्या एका तरूणाने मराठा आरक्षणासाठी जीवन संपवल्‍याची घटना आहे. मराठा आरक्षणासाठी जीव संपवणार असल्‍याची चिठ्ठी सापडली आहे. हि घटना (मंगळवार) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

या घटनेची माहिती अशी की, जळकोट (ता. तुळजापूर) येथील हत्तेनगर मध्ये राहणाऱ्या राहुल किसनMaratha Reservation जाधव (वय ३३) हा शिक्षण घेऊन बेकार होता. शिक्षण घेऊन नोकरी नसल्याने कामधंदा करून उदरनिर्वाह करत होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावे. यासाठी मराठा आरक्षणाच्या विविध आंदोलनात राहुल जाधव सहभागी झाला होता. जळकोट येथे झालेल्या साखळी उपोषणातही त्यांनी आपला प्रत्यक्ष सहभागी झाला होता. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्‍याने स्वतःची जीवनयात्रा संपवली. राहुल जाधव या तरूणाने राहत्या घराच्या एका खोलीत पत्र्याच्या अँगलला दोरीने गळफास घेऊन जीवन संपवले. हि घटना घडताच गावातील मराठा आरक्षणाच्या संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी घराकडे धाव घेऊन कुटुंबीयांना मदत केली.

राहुल किसन जाधव यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्या चिठ्ठीत राहुल जाधव मराठा आरक्षणासाठी जीव देणार आहे. एक मराठा, लाख मराठा असा मजकूर लिहिलेला आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी जीवन संपवण्याचे सत्र सतत सुरू आहे. किसन जाधव यांच्या कुटुंबाला शासनाने मदत करावी अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा : 

Back to top button