Imtiaz Jaleel Bail Nashik TCS Case : नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस (TCS) कंपनीतील महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी एमआयएमचे (MIM)नेते इम्तियाज जलील ( Imtiaz jaleel) यांना 50 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणी नाशिक न्यायालयाने जलील यांना समन्स बजावले होते. आज (दि. १९ नोव्हेंबर) - न्यायमूर्ती खारकर यांच्यासमोर जामीन अर्जावर सुनावणी झाली. सुनावणीनंतर न्यायालयाकडून जलील यांना जामीन मंजूर केला.
या प्रकरणातील प्रमुख निदा खान हिला मदत केल्याच जलील यांच्यावर आरोप आहे. पोलीस निदा खानचा शोध घेत असताना तिला मदत केल्याचा जलील यांच्यावर आरोप आहे. मतीन पटेल यांनी जलील यांच्या सांगण्यावरूनच निदा खान हिला आश्रय दिल्याचा पोलिसांनी म्हटलं होतं.