Nashik TCS case | धर्मांतर प्रकरणाचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर

निदा खानचा मोठा कट उघड
nida khan
TCS Nashik Casepudhari photo
Published on
Updated on

नाशिक : शहरातील टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार, विनयभंग आणि कथित धर्मांतर प्रकरणाचे धागेदोरे आता आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणाकडे संघटित कट म्हणून पाहात तपास यंत्रणेला सखोल चौकशीचे निर्देश नाशिक जिल्हा न्यायालयाने दिले आहेत. परकीय निधी आणि आंतरराष्ट्रीय सिंडिकेटच्या सहभागाचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.

nida khan
Ashok Kharat |अशोक खरातला ९ मे पर्यंत पोलिस कोठडी

या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानने आपल्या पदाचा गैरवापर करून पीडितेवर दबाव टाकल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पीडितेच्या मोबाइलमध्ये इस्लामिक धार्मिक अॅप्लिकेशन्स सक्तीने इन्स्टॉल करण्यात आले होते. तसेच, तिचे नाव बदलून हनिया करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याहून धक्कादायक बाब म्हणजे, पीडितेला मलेशियातील इम्रान नावाच्या व्यक्तीकडे पाठवण्याचा कट रचल्याचे समोर आले आहे.

तपासादरम्यान पोलिसांनी पीडितेकडील बुरखा जप्त केला आहे. संशयित दानिश शेखने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर अत्याचार केल्याचा आरोप असून, त्याने तिची शैक्षणिक कागदपत्रेही ताब्यात घेतलेली असल्याचे समोर आले आहे, तर दुसरा आरोपी तौसिफ अत्तारने कामाच्या ठिकाणी पीडितेकडे लैंगिक मागण्या करत तिला

धमकावल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील मलेशिया कनेक्शन आणि परकीय आर्थिक व्यवहारांचा तपास एसआयटीकडून सुरू आहे. निदा खानने गर्भवती असल्याचे कारण देत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळून लावत कडक शब्दांत आपले निरीक्षण नोंदवले. 'कायद्यासमोर सर्व समान आहेत. हा एक संघटित कट असून, परकीय निधी आणि मालेगाव कनेक्शनचा तपास करण्यासाठी आरोपीची कोठडीत चौकशी आवश्यक आहे,' असे न्यायालयाने स्पष्ट केले. निदा खान ही २७ मार्चपासून फरार झालेली असून, पोलिस तिचा शोध घेत आहेत. या प्रकरणात अधिक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

nida khan
Nashik bribery case | ५० हजारांची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्याला अटक

संशयितांना न्यायालयीन कोठडी

टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक शोषण व जबरदस्तीने धर्मांतर प्रकरणातील पाच संशयित आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. सदर प्रकरणातील संशयित आरोपी अश्विनी चेनानी, तौसिफ बिलाल अत्तार, दानिश एजाज शेख, शाहरुख हुसेन शौकत कुरेशी आणि रझा रफिक मेमन यांची पुन्हा रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. संशयितांपैकी अश्विनी चेनानीला सध्या कोठडीत ठेवण्यात आलेले नाही. परंतु उर्वरित चार आरोपी पोलिस कोठडीत आहेत. यामधील प्रमुख संशयित आरोपी निदा खान ही अजूनही फरार आहे. तिचा जामीन अर्ज यापूर्वीच फेटाळण्यात आलेला आहे.

सहायक आयुक्त संदीप मिटके यांचे विशेष तपास पथक तिचा शोघ आहेत. टीसीएस प्रकरणातील पीडित महिलांचे जबाब नोंदविण्यात आलेले आहेत. तसेच डिजिटल पुरावे, कॉल डिटेल्स तसेच आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात आलेली आहे. विशेष तपास पथकाकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news