Ice Gola Side Effects | बर्फाचा गोळा खाताय की 'बॅक्टेरिया'?

Ice Gola Side Effects | सावधान : अस्वच्छ पाण्यापासून बनविलेल्या बर्फाची सर्रास विक्री
Ice Gola Side Effects
Ice Gola Side Effects
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

उन्हाच्या तीव्र झळांनी अंगाची लाही-लाही होत असल्याने, आपसूकच पाय बर्फाच्या गाडीकडे वळत आहेत. तेथे रंगीबेरंगी, रसरसीत आणि वेगवेगळे फ्लेवर असलेल्या बर्फाचा गोळा बघितल्यानंतर तो खाण्याचा मोह होत नसेल तरच नवल.

Ice Gola Side Effects
Nashik Municipal Corporation |नाशिकमध्ये सिंहस्थापूर्वी हॉकर्स झोनचे फेरनियोजन! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापौरांचा मोठा निर्णय

मात्र, हा गोळा खाताना, आपण 'बॅक्टेरिया' तर खात नाही ना? याचा कधी तुम्ही विचार केला काय? बर्फाचा हाच गोळा अनेक संसर्गजन्य आजारांना निमंत्रण देणारा असल्याने, तो खाताना सावधान! सध्या उष्णतेची लाट पसरल्याने, जागोजागी शीतपेय, रसवंतीगृह नजरेस पडत आहेत. या ठिकाणी मिळणाऱ्या थंडगार पदार्थांमध्ये बर्फाचा मोठा वापर केला जात आहे. किंबहुना ग्राहकांकडूनच बर्फाची मागणी होत आहे.

मात्र, हा बर्फ निकृष्ट दर्जाचा असण्याची दाट शक्यता असल्याने, नागरिक स्वतःच आजारांना निमंत्रण देत आहेत. सध्या उसाचा रस, रंगीबेरंगी बर्फाचा गोळा, थंडगार ताक, लिंबू पाणी, ज्युस, लस्सी आदी शीतपेयांना मोठी मागणी आहेत.

मात्र, या शीतपेयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बर्फात 'ई-कोलाय' नावाचा बॅक्टेरिया असण्याची दाट शक्यता असल्याने, घातक जीवाणू आपसूकच आपल्या शरीरात शिरकाव करीत आहेत. अनेकदा स्टोरेजसाठी असणारा कच्चा बर्फ हा शीतपेयांसाठी स्वस्त विक्री केला जातो.

अशा बर्फामुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात. तसेच गोळा विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या हातात अनेकदा ग्लोज नसतात, त्यामुळे अस्वच्छ हातानेच ते गोळा बनवतात. असा अस्वच्छ गोळ्याचे पदार्थ खाल्ल्यास पोटाचे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे बर्फाचा गोळा खाताना सावधगिरी बाळगायला हवी.

Ice Gola Side Effects
TCS Nashik Operations Update | नाशिक टीसीएस प्रकरणात कंपनीचा मोठा निर्णय! सर्व संशयित निलंबित, कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चे आदेश

जनावरांवर आढळणारा बॅक्टेरिया

'ई-कोलाय' हा मानव आणि प्राण्याच्या शरीरात आढळणारा बॅक्टेरिया आहे. ई-कोलायचे अनेक प्रकार आहेत, त्यातील काही बरेचसे निरुपद्रवी, काही उपयोगी आणि काही घातक असतात. यापैकी 'केरोटॉक्सिन' हा एक अविषारी असा ई-कोलाय बॅक्टेरिया पाण्यात आढळतो.

हा बॅक्टेरिया गाई-गुरे, म्हशी अशा पाळीव प्राण्यांमध्येही आढळून येतो. परंतु, मानवामध्ये केरोटॉक्सिन हा घटक अतिशय संसर्गजन्य असून, यामुळे वेगवेगळे आजार होऊ शकतात. केरोटॉक्सिन आपल्या शरीरातील पेशींमध्ये तयार होणाऱ्या प्रोटीनला रोखून धरतो. प्रोटीन तयार होणे बंद झाले तर शरीरातील पेशी मरू लागतात व पेशींची संख्या कमी होते व वेगवेगळे आजार बळावतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news