TCS Nashik Operations Update | नाशिक टीसीएस प्रकरणात कंपनीचा मोठा निर्णय! सर्व संशयित निलंबित, कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चे आदेश

TCS Nashik Operations Update | टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांच्याकडे मागणी
TCS Nashik Operations Update
TCS Nashik Operations UpdatePudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महिलांचे लैगिंक शोषण, विनयभंग, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याबाबतचे प्रकरण समोर आल्याने, टीसीएस कंपनी व्यवस्थापनाने तत्काळ काही कठोर निर्णय घेतले आहेत.

TCS Nashik Operations Update
Nashik ZP Gram Sevak Suspension | समाजमाध्यमांवर व्हिडिओ व्हायरल; ग्रामसेवकाचे निलंबन

या प्रकरणातील सर्व संशयितांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले असून, पोलिस चौकशीमुळे इतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम सुरू केले आहे. दरम्यान, कामकाज बंद केले जाऊ नये, अशी मागणी टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांच्याकडे भाजप गुड गव्हर्नन्स सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी केली आहे.

पेशकार यांनी ई-मेलच्या माध्यमातून एन. चंद्रशेखरन यांच्याशी संपर्क साधला. त्यात त्यांनी म्हटले की, टीसीएसच्या नाशिक शाखेत घडलेला प्रकार निंदनीय आहे. मात्र, कंपनीची नाशिक स्थित शाखा एक उदयोन्मुख आयटी केंद्र असून, नाशिकमध्ये तरुणांना रोजगाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.

TCS Nashik Operations Update
ED Raid Nashik Ashok Kharat | भोंदू अशोक खरातच्या 'ओकस प्रॉपर्टी'वर ईडीचा छापा; साडेतीन तास चालली झाडाझडती

याशिवाय आयटी उद्योगांना आकर्षित करणारे हे केंद्र असल्याने, नाशिकच्या आयटी क्षेत्रासाठी ही शाखा नेहमीच बळ देत आली आहे. आपण संशयित कर्मचाऱ्यांवर केलेल्या कारवाईचे आम्ही कौतुक करतो. मात्र, शाखा बंद केल्यास जनतेमध्ये अनावश्यक शंका, गैरसमज निर्माण होऊ शकतात.

याशिवाय, शहराच्या आयटी परिसंस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कंपनी सुरळीत सुरू ठेवावी, अशी मागणी पेशकार यांनी केली. त्यास एन. चंद्रशेखरन यांनी प्रतिसाद देत, पाठिंबा आणि आपुलकीबद्दल आभार व्यक्त केले. तसेच चौकशी पूर्ण झाल्यानंतर वैयक्तिकरित्या भेटण्याचे आश्वासन देखील दिले. दरम्यान, नाशिकचे आयटी भविष्य सुरक्षित करण्याची गरज असून, त्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही पेशकार यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news