शिरपूर तालुक्यातील सीमा तपासणी नाक्याजवळ 42 लाखांचा गुटखा साठा जप्त

शिरपूर तालुक्यातील सीमा तपासणी नाक्याजवळ 42 लाखांचा गुटखा साठा जप्त
Published on
Updated on

धुळे : पुढारी वृत्तसेवा-मध्यप्रदेशातून मुंबईकडे जाणारा सुमारे 42 लाखाचा गुटख्याचा साठा शिरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील हाडाखेड तपासणी नाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावरून गुटक्याची तस्करी होणार असल्याची माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी हाडाखेड जवळील सीमा तपासणी नाक्याजवळ सापळा रचला. दरम्यान ही माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे तसेच अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांना देण्यात आली. यानंतर उपविभागीय अधिकारी सचिन हिरे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक सुनिल वसावे, विजय पाटील, हेड कॉन्स्टेबल संतोष पाटील, यांनी संशयित वाहनांची तपासणी करणे सुरू केले.त्यानुसार हाडाखेड आरटीओ चेकपोस्टजवळ एच. आर. ५५ एक्स. ६९१३ क्रमांकाच्या कंटेनरला थांबविले. कंटेनर चालकाची चौकशी सुरु केली. चालकाने त्याचे नाव अजीज शरीफ (वय ४०, रा. अंजनपूर ता. फिरोजपूर जि. नुहु, हरियाणा) असे सांगितले. कंटेनरमधील मालाबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर कंटेनरची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा, पानमसाला मिळुन आला.

एकूण 62 लाखांचा मुद्देमाल जप्त झाला आहे. यात २९ लाख ९५ हजार २०० रूपये किंमतीचा रॉयल १००० नावाचा गुटखा, १२ लाख ४४ हजार ८८० रुपये किंमतीचा एसएनके (सनकी) नावाचा गुटखा व २० लाखांचा कंटेनर असा एकुण ६२ लाख ४० हजार ८० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील कारवाईसाठी अन्न प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्तांना माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news