Commercial LPG Supply | व्यावसायिक एलपीजीवरील निर्बंध उठवा

Commercial LPG Supply | गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीची मागणी; राज्य सरकारला पत्र
LPG cylinder gas |
LPG Gas SupplyPudhari
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध समाप्त होऊन शांतता करार झाल्याच्या पार्श्वभूमीवर गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने (जीसीसीआय) रेस्टॉरंट्स व हॉटेल्सना होणाऱ्या व्यावसायिक एलपीजी पुरवठ्यावरील निर्बंध उठवण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात जीसीसीआयने राज्य सरकारला पत्र पाठवले आहे.

LPG cylinder gas |
Sindhudurg News| इंधन दरवाढीने महागाईचा भडका

युद्धकाळात केंद्र सरकारने घरगुती ग्राहकांना एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य दिले होते आणि व्यावसायिक वापरासाठी होणारा पुरवठा मर्यादित केला होता. या निर्णयाचा परिणाम हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बेकरी, कॅन्टीन आणि केटरिंग आस्थापनांवर मोठ्या प्रमाणावर झाला.

गोव्यातील व्यावसायिक स्वयंपाक मोठ्या प्रमाणावर एलपीजीवर अवलंबून असल्याने उद्योग क्षेत्रावर गंभीर परिणाम जाणवला. आता युद्धस्थिती संपुष्टात आल्याने आणि पर्यटन हंगाम जवळ येत असल्याने हे निर्बंध तातडीने उठवावेत, अशी मागणी चेंबरने केली आहे. जीसीसीआयने केंद्र सरकारकडे इंधन दर स्थिर ठेवण्याबरोबरच भविष्यात ते कमी करण्याचीही मागणी केली आहे.

राज्यातील मासेमारी, लॉजिस्टिक्स, आंतरराज्यीय मालवाहतूक आणि पर्यटन वाहतूक यामध्ये डिझेल महत्त्वाचा घटक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. वेर्णा, कुंडई आणि फोंडा येथील एमएसएमई उद्योगांसाठी डिझेल दरात प्रति लिटर २ ते ३ रुपयांची घट झाल्यास त्याचा मोठा दिलासा मिळू शकतो. तसेच वाहतूक आणि जनरेटर खर्च कमी झाल्यास पर्यटन क्षेत्रालाही फायदा होईल, असे चेंबरने म्हटले आहे.

इंधन दरवाढ आणि एलपीजी टंचाईमुळे गोव्यातील फार्मा, पॅकेज्ड फूड आणि हलक्या अभियांत्रिकी उद्योगांच्या ऑर्डर वितरणात विलंब झाला असून खेळत्या भांडवलावर ताण वाढल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली झाल्यामुळे कंटेनर वाहतूक सुरळीत होईल, मालवाहतूक खर्च कमी होईल आणि आखाती देशांतील खरेदीदार पुन्हा व्यापार सुरू करतील, अशी अपेक्षा जीसीसीआयने व्यक्त केली आहे.

LPG cylinder gas |
US-Iran war | सैद्धांतिक भ्रमांचे सावट युद्धबंदीवर

एलपीजी पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी

जीसीसीआयच्या अध्यक्षा प्रतिमा धों यांनी सांगितले की, हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी व्यावसायिक एलपीजी पुरवठा पूर्ववत करणे हे तातडीचे प्राधान्य आहे. कच्च्या तेलाच्या किमती स्थिर झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेल दरातही घट होण्याची अपेक्षा आहे. होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली झाल्याने मालवाहतूक आणि विमा खर्च कमी होईल, तसेच गोव्याच्या निर्यातदारांना पश्चिम आशियाई बाजारपेठांशी पुन्हा जोडता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news