Go-Green Registration : नाशिक परिमंडळात ४१ हजार वीजग्राहक वाचवतात वर्षाला ४९ लाख

Go-Green Registration : नाशिक परिमंडळात ४१ हजार वीजग्राहक वाचवतात वर्षाला ४९ लाख
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महावितरणच्या नाशिक परिमंडळामध्ये गो -ग्रीन सेवेला (Go-Green Registration) ग्राहकांचा वाढता प्रतिसाद लाभतो आहे. परिमंडळातील ४० हजार ८३५ ग्राहकांनी कागदी बिलाऐवजी ऑनलाइन बिलाचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे गो-ग्रीन नोंदणी केलेल्या प्रत्येक ग्राहकाची वार्षिक १२० रुपये याप्रमाणे एकूण ४९ लाखांची बचत झाली आहे. ई-मेल व एसएमएस बिलाच्या पर्यायामध्ये ग्राहकांना दर महिन्याच्या बिलामागे १० रुपयांची सवलत मिळते.

पर्यावरणाच्या रक्षणासाठी महावितरणकडून गो-ग्रीन योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये वीजबिलाच्या छापील कागदाऐवजी फक्त ई-मेल व एसएमएसचा पर्याय निवडल्यास वीज ग्राहकांना प्रती बिलात दहा रुपये सवलत देण्यात येते. या पद्धतीने ग्राहकाला वार्षिक १२० रुपये वाचविता येतात. विजबिल तयार झाल्यानंतर लगेचच ई-मेल तसेच एसएमएसद्वारे दरमहा बिल प्राप्त होत असल्याने ग्राहकांना प्रॉम्प्ट पेमेंट्सह ते तत्काळ घरबसल्या ऑनलाइनद्वारे भरण्याची सोय उपलब्ध आहे. सोबत ऑनलाइन वीजबिल भरल्यास ग्राहकाला वीजबिलाच्या ०.२५ टक्के किंवा जास्तीत-जास्त ५०० रुपयांपर्यंत महावितरणकडून सूट दिली जाते. (Go-Green Registration)

वर्षभराचे बिल उपलब्ध

सध्या नाशिक जिल्ह्यात २४ हजार ३८३ आणि नगर जिल्ह्यात १६ हजार ४५२ अशाप्रकारे एकूण परिमंडळात ४० हजार ८३५ वीजग्राहकांनी गो-ग्रीन योजनेत सहभाग घेतला. ग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेलद्वारे प्राप्त झालेले बिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येते. महावितरणच्या http://www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील अकरा महिन्याचे असे एकूण बारा महिन्यांचे वीजबिले मूळ स्वरूपात उपलब्ध असतात.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news