

Nashik Ganesh Visarjan Procession Halted: नाशिक शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मिरवणूक थांबवत ठिय्या आंदोलन केले. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महात्मा गांधी रोडवर ठिय्या आंदोलनाला बसले. या आंदोलनामागचं कारण म्हणजे पोलिसांकडून मिरवणूक लवकर पुढे नेण्याचा प्रयत्न केला जात होता.
या दरम्यान गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना अचानक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मिरवणूक पुढे नेण्यास विरोध केला. महात्मा गांधी रोडवरच त्यांनी ठिय्या मांडला. त्यामुळे मिरवणुकीचा मार्ग काही काळ अडवला गेला आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी तातडीने हस्तक्षेप केला. मिरवणूक वेळेत पुढे जावी आणि वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी पोलिसांकडून कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली. तसेच मिरवणूक पुढे नेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला.
मात्र, मिरवणूक पुढे न नेण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. त्यामुळे पोलिस आणि गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. कार्यकर्त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले.
सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. मिरवणुकीदरम्यान निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत कार्यकर्त्यांकडून भूमिका मांडण्यात आली.
दरम्यान, गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या गणेश मंडळांमुळे महात्मा गांधी रोड परिसरात मोठी गर्दी झाली होती. त्यातच ठिय्या आंदोलनामुळे मिरवणूक काही काळ थांबली. त्यामुळे पोलिसांसमोर मिरवणूक सुरळीतपणे पुढे नेण्याचे आव्हान निर्माण झाले.
पोलिस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कार्यकर्त्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.