नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या (Maharashtra Labor Welfare Board) ६९व्या राज्यस्तरीय अंतिम नाट्य स्पर्धेला गुरुवारी (दि. ८) सुरुवात होत आहे. दि. ८ ते २५ फेब्रुवारी दररोज सायंकाळी ७ वाजता परशुराम साइखेडकर नाट्यगृहात नॉनस्टॉप नाटकांची बुलेटट्रेन रसिकांना विनामूल्य अनुभवायला मिळणार आहे.
स्पर्धेचा उद्घाटन सोहळा गुरुवारी (दि. ८) सायंकाळी ६ वाजता होणार असून उद्घाटक म्हणून आ. देवयानी फरांदे, तर प्रमुख पाहुणे म्हणून नाट्यलेखक दत्ता पाटील, कामगार उपायुक्त विकास माळी, नीलय इंडस्ट्रीचे संचालक दिलीप गिरासे, राज्य कामगार संघाचे अध्यक्ष विक्रम नागरे उपस्थित राहणार आहेत. (Maharashtra Labor Welfare Board)
स्पर्धेचे वेळापत्रक असे…
(दि. ८) सोशल किडा, (दि. ९) मुंबई मान्सून, (दि. १०) धर्मदंड, (दि. ११) ती मी आणि तो, (दि. १२) हम दो छे, (दि. १३) प्रथम पुरुष, (दि. १४) अशी पाखरे येती, (दि. १५) गंमत असते नात्याची, (दि. १६) कृष्ण विवर, (दि. १७) इथर, (दि. १८) गटार, (दि. १९) करार, (दि. २०) एक शून्य बाजीराव, (दि. २१) सती, (दि. २२) पूर्णविराम, (दि. २३) विठाईच्या काठी, (दि. २४) अनपेक्षित, (दि. २५) अजूनही चांदरात आहे