देशात-राज्यात काँग्रेसचेच सरकार येणार : प्रतापगढी

देशात-राज्यात काँग्रेसचेच सरकार येणार : प्रतापगढी

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा

कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडोला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित जनसंवाद यात्रेला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळत असल्याने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचीच सत्ता येईल. केंद्र व राज्य सरकार त्यांचे अपयश लपविण्यासाठी जनतेच्या मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करत असल्याचा आरोप काँग्रसचे अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार इम्रान प्रतापगढी यांनी पत्रकार परिषदेत केला. काँग्रेस पक्ष एकसंघ असुन फुटणार असल्याचे अफवा असल्याचे त्यांनी सांगितले .

शहरात आयोजित अल्पसंख्यांक सेलच्या वतीने आयोजित सभेसाठी आलेले खा. प्रतापगढी बोलत होते. जनसंवाद यात्रेला मिळालेल्या प्रतिसादामुळे सरकारच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे ते काँग्रेस पक्षावर आरोप करत आहेत. कोरोना काळात महाविकास आघाडीने उत्कृष्ट काम केले. परंतु भाजपच्या तोडफोडीच्या राजकारणाने त्यांचे सरकार आले आहे. पण या भाजप सरकारने राज्यात कोणताही विकास केलेला नाही. नाशिक शहरातही स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोणताही विकास झाला नसल्याचा दावा त्यांनी केला.

नाशिकमधील कांद्याचे भाव गडगडले, परंतु त्यांना मूळ हमीभाव मिळालेला नाही. पेट्रोल-डिझेल, गॅसचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाई तसेच बेरोजगार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. काँग्रेस सरकारच्या काळात चारशे रुपयांवर असलेला गॅस बाराशे रुपयांवर पोहोचला आहे. भाजप सरकारने दोनशे रुपये कमी करून जनतेची दिशाभूल केल्याचा दावा त्यांनी केला.

रिझर्व्ह बँकेचे नावही बदलणार का?

भाजप सरकार स्वतःचे अपयश लपविण्यासाठी शहरांपासून देशाचे नाव बदलण्यास निघाले आहे. परंतु इंडिया म्हणजेच भारत असल्याचे खासदार प्रतापगढी यांनी सांगितले आहे. इंडिया नाव बदलत असेल तर रिझर्व बँक ऑफ इंडियासह इतर सरकारी कार्यालयांवरील इंडीया नावे कशी बदलणार,? असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. मराठा आरक्षण आंदोलनावरील लाठीमारमागे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री कारणीभूत असल्याचा आरोपही खा. प्रतापगढी यांनी केला. यावेळी आ. डॉ . वजाहत मिर्झासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news