Savitribai Phule Pune University : पीएच.डी. प्रवेशाचा बिगुल; मार्गदर्शकांकडून मागवल्या रिक्त जागा

Savitribai Phule Pune University : पीएच.डी. प्रवेशाचा बिगुल; मार्गदर्शकांकडून मागवल्या रिक्त जागा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी पीएच.डी. अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यापीठातील शैक्षणिक विभाग आणि संलग्नित मान्यताप्राप्त संशोधन केंद्रातील संशोधक मार्गदर्शकांकडे रिक्त असलेल्या जागांची माहिती अद्ययावत करण्यासाठी विद्यापीठाने 20 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे यंदाच्या पीएच.डी. प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या 7 नोव्हेंबर 2022च्या निर्णयानुसार प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यासाठी विद्यापीठातील शैक्षणिक विभाग व संलग्नित मान्यताप्राप्त संशोधन केंद्र येथील मान्यताप्राप्त संशोधक मार्गदर्शकांकडे रिक्त असलेल्या जागांची माहिती ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात आली आहे. संशोधक मार्गदर्शकांना सर्वप्रथम त्यांच्या लॉगिनमध्ये त्यांच्याकडील रिक्त जागा घोषित करण्यासाठी संबंधित संशोधक केंद्र जागा घोषित करण्यासाठी उपलब्ध असल्याची खात्री करावी लागेल.

संबंधित संशोधन केंद्राकडे त्या विषयामध्ये संलग्निकरण नसल्यास ते संशोधन केंद्र पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र असणार नाही. संशोधक मार्गदर्शकाचे शिक्षक मान्यतेचे स्वरूप कायमस्वरूपी, नियमित असणे आवश्यक आहे. त्यात काही बदल झाल्यास तो तत्काळ विद्यापीठास कळवावे लागणार आहे. एका संशोधकाला एकाच संसोधन केंद्रासोबत संलग्नित राहता येणार आहे. विद्यापीठाचे संशोधन केंद्र मान्यतापत्र शैक्षणिक वर्ष 2023-24 चे असल्याशिवाय प्रवेश प्रक्रिया करता येणार नाही.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news