मालेगाव मनपाचा बिट मुकादम ‘एसीबी’च्या जाळ्यात | पुढारी

मालेगाव मनपाचा बिट मुकादम 'एसीबी'च्या जाळ्यात

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा; शाळेच्या अनधिकृत बांधकामाचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर करण्यासाठी पाच हजारांची लाच घेणारा मालेगाव महापालिकेचा बिट मुकादम लाचलुचपच प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि. २) रंगेहाथ पकडला. मनाेहर बाबूलाल ढिवरे (४५) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

शहरातील जम जम प्राथमिक व जन्नत माध्यमिक विद्यालयातील कथित अनधिकृत बांधकामाबाबत एकाने मालेगाव मनपाकडे तक्रार केली होती. या बांधकामावर कायदेशीर कारवाईची मागणी त्यांनी अर्जाद्वारे केली होती. या अर्जानुसार प्रस्ताव वरिष्ठांना सादर करण्यासाठी बिट मुकादम ढिवरे याने १० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती पाच रुपये ठरले होते. त्यानुसार गुरुवारी मनपामध्ये पैसे घेताना ‘एसीबी’च्या पथकाने ढिवरेला ताब्यात घेतले. या कारवाईने मनपा वर्तुळात एकच खळबळ उडाली. पोलिस निरीक्षक नाना सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत गु्न्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा :

Back to top button