File photo
File photo

नाशिक : पेठ रोडवर महिलेचा विनयभंग

नाशिक : पैशांची मागणी करीत एकाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना पेठ रोडवर घडली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात संशयित सतीश ऊर्फ पिंटू भिकुनाथ गुप्ता (३८, रा. कर्णनगर) याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयिताने ७ एप्रिलला पैशांची मागणी करीत दमदाटी केली व विनयभंग केला. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस तपास करीत आहेत.

पेठ रोडवर महिलेस मारहाण

पेठ रोडवरील अश्वमेधनगर परिसरात दोघांनी मिळून महिलेस मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. जयश्री माळवे यांच्या फिर्यादीनुसार, संशयित राजू महाले व नीलेश महाले यांनी रविवारी (दि.२३) सकाळी अकराच्या सुमारास आर्थिक कारणावरून कुरापत काढून शिवीगाळ करीत काठीने मारहाण करून दुखपात केली. परिसरातील कुंड्याची तोडफोड करून नुकसान केले. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात दोघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल आहे.

हेही वाचा : 

logo
Pudhari News
pudhari.news