[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]
नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
हिरावाडी भागातील गोकुळधाम या बहुमजली रहिवासी इमारतीमध्ये आग लागते… त्यामध्ये धुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी अग्निशमनकडून शर्थीचे प्रयत्न केले जातात… ३२ मीटर उंच शिडीच्या साहाय्याने आश्रयस्थान भागातून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले जाते… परंतु हे मॉकड्रिल असल्याचे सांगितले जाते आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडतो..!
नाशिक महापालिका अग्निशमन विभागामार्फत दि. १४ ते २० एप्रिल दरम्यान अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी (दि. १६) मॉकड्रिल करण्यात आले. यावेळी इमारतीमधील महिलांना अग्निरोधक कशाप्रकारे हाताळून आग विझवावी, याबाबत माहिती दिली. एलपीजी गॅस सिलिंडर हाताळताना कशाप्रकारे काळजी घ्यावी, याचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. आग लागली, तर कशी आटोक्यात आणावी, इमारतीमधील आग प्रतिबंधक उपाययोजना कशाप्रकारे ऑपरेट करावी, याबाबतची नागरिकांना माहिती देण्यात आली.
या मॉकड्रिलमध्ये गोकुळधाम इमारतीमधील राहिवासी यांच्यासह मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी, लीडिंग फायरमन संजय कानडे, प्रदीप बोरसे, फायरमन बाळासाहेब लहामगे, मंगेश पिंपळे, विजय नागपुरे, विजय चव्हाणके, वाहनचालक अशोक सरोदे, शांताराम गायधनी, मुस्ताक पाटकरी यांनी सहभाग घेतला होता. तसेच महाराष्ट्र फायर सर्व्हिस अकादमीच्या १० जवानांनी या मॉकड्रिलमध्ये सहभाग घेतला होता.
हेही वाचा :