नाशिक : सिडको विभागात उद्या पाणीपुरवठा बंद

नाशिक : सिडको विभागात उद्या पाणीपुरवठा बंद
Published on
Updated on

नाशिक : महापालिका हद्दीतील शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी वितरण होणाऱ्या ९०० मिमी व्यासाच्या पीएससी जलवाहिनीला अंबडजवळ मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. यामुळे दुरुस्तीचे काम हाती घ्यावयाचे असल्याने सिडको विभागातील प्रभाग क्रमांक २४ ते २९ मधील भागांत बुधवारी (दि.१) सकाळ, दुपार आणि संध्याकाळचा पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. तसेच गुरुवारी (दि.२) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यानी केले आहे.

खालील भागांत पाणीपुरवठा बंद राहील

प्र. क्र. २४: कालिका पार्क, उंटवाडी परिसर

प्र. क्र. २५ : इंद्रनगरी, पवननगर, माउली लॉन्स, सावतानगर, त्रिमूर्ती चौक, कोकण भवन परिसर, कामटवाडे गाव व परिसर.

प्र. क्र. २६ : मोगलनगर, साळुंकेनगर, वावरेनगर, शिवशक्तीनगर व चौक, आयटीआय परिसर, खुटवडनगर, मटालेनगर, आशीर्वाद नगर, संजीव नगर, जाधव संकुल पाटील, पार्क विरार संकुल

प्र. क्र. २७ : अलीबाबा नगर, दातीर वस्ती, अंबडगाव, हुजेफा फर्निचर, ग्लोबल शाळा व परिसर.

प्र. क्र. २८ : लक्ष्मीनगर, अंबड गाव ते माउली वृंदावननगर, माउली लॉन्स परिसर, अंबड गाव परिसर, लॉन्स साई, ग्रामनगर, उपेंद्रनगर, महाजननगर, सहावी स्कीम.

प्र. क्र. २९ : भाद्रपद सेक्टर आझाद पंछी परिसर, शनिमंदिर परिसर, मोरवाडी गाव व इतर परिसर

हेही  वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news