नाशिक : जुनी पेन्शन योजनेसाठी “एनपीएस हटाव सप्ताह” राबविणार

नाशिक : जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शासकिय कार्यालयात एकत्र येत घोषणा देताना राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते. (छाया: हेमंत घोरपडे)
नाशिक : जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शासकिय कार्यालयात एकत्र येत घोषणा देताना राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते. (छाया: हेमंत घोरपडे)

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेकडून "एनपीएस हटाव सप्ताह" संपूर्ण महाराष्ट्रातून राबविण्यात येत आहे. सोमवार दि. २१ ते २५ तारखेपर्यंत हा सप्ताह आयोजित करण्यात आला असून यामध्ये सर्व एनपीएस धारक अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातून या सप्ताहास सुरुवात करुन शासकीय कार्यालयात दुपारी जेवणाच्या सुट्टीत एकत्र येत अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी तीव्र घोषणाबाजी केली. त्याचप्रमाणे सर्वांनी उपस्थित राहून सप्ताहाच्या संपूर्ण पाच दिवस तीव्र घोषणा देऊन जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी आग्रही राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष दिनेश वाघ, सरचिटणीस सुनंदा जरांडे, उपाध्यक्ष अर्चना देवरे, शामसुंदर जोशी, डी. जी. पाटील व सर्व पदाधिकारी, महसूल संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र जगताप, तुषार नागरे, जीवन आहेर, रमेश मोरे, रविंद्र पवार, अरुण तांबे आदी पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news