

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : दख्खनचा ताज म्हणून ओळख असलेल्या बिबी का मकबरा येथील एका मिणारचा कोपरा शनिवारी सायंकाळच्या सुमारास (दि.19) ढासळला. सततच्या पावसामुळे कोपरा ढासळला असल्याची माहिती पुरातत्व विभागाने दिली.
बिबी का मकबारा वायू प्रदूषणामुळे काळवंडला आहे. तसेच काही ठिकाणी तडेही गेले आहेत. याची नियमित पाहणी व डागडुजीचे काम हाती घेण्यात येते. नुकत्याच ढासळलेल्या मिनारची डागडुजी दीड वर्षापूर्वीच झाले होते. काही काम सततच्या पावसामुळे थांबवण्यात आले होते.त्यातच ही घटना घडली.
मिनारचा ढासळलेला कोपर्याच्या दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पुरातत्त्व विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
हेही वाचा