नाशिक : व्हीआयएस नेटवर्कच्या माध्यमातून जि.प. शाळेचे रुपडे पालटले

दिंडोरी: कृष्णगाव जि. प. शाळेला व्हीआयएस नेटवर्क प्रा. लिमिटेडच्या वतीने शालेय साहित्य भेटप्रसंगी उपस्थित मान्यवर. (छाया - समाधान पाटील).
दिंडोरी: कृष्णगाव जि. प. शाळेला व्हीआयएस नेटवर्क प्रा. लिमिटेडच्या वतीने शालेय साहित्य भेटप्रसंगी उपस्थित मान्यवर. (छाया - समाधान पाटील).

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

जिल्हयातील आदिवासी ग्रामीण भागात असलेल्या कृष्णगाव जिल्हा परिषद शाळेस व्हीआयएस नेटवर्क प्रा. लि. कंपनीने सीएसआर फंडातून डिजीटल शाळेसाठी अत्याधुनिक डिजीटल साहित्याचा पुरवठा करुन दिल्याने शाळेचे रुपडे पालटले आहे. जिल्हा परिषद शाळा डिजीटल झाली आहे. तसेच क्रीडा साहित्याबरोबरच १७० विद्यार्थ्यांना वैयक्तिक शैक्षणिक साहित्यासह मायेची उब म्हणून स्वेटरची भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

नाशिक – वणी रस्त्यावरील कृष्णगाव येथील जिल्हा परिषद शाळेस पंधरवड्यापूर्वी  व्हीआयएस नेटवर्क प्रा. लि. कंपनीचे रिजनल सेल्स व्यवस्थापक रवींद्र ठोंबरे यांनी सप्तशृंगी गडावर जात असतांना भेट दिली. शाळेतील प्रसन्न वातावरण व स्वच्छंद बागडणारी आदिवासी मुले बघून त्यांना शालेय स्तरावर मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या इच्छेला दुजोरा देऊन संपूर्ण समुहाने शाळेसह विद्यार्थ्यांचीही गरज लक्षात घेवून कंपनीच्या सीएसआर अंतर्गत शाळेचे रुपडे पालटले. जिल्हा परिषदेची सामान्य शाळा ही डिजीटल शाळा झाली. शाळेत खेळणी, क्रिडा साहित्य व वैयत्तिक शैक्षणिक व विद्यार्थ्यांला स्वटेर भेट म्हणून मिळाले. त्याचप्रमाणे ८ लाख रुपयाच्या शालेय वस्तू शाळेस सीएसआर अंतर्गत भेट देण्यात आल्या. यात एक प्रोजेक्टर, तीन अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही, तीन संगणक, मुलांना खेळण्यासाठी खेळणी शाळेला भेट देण्यात आले. तसेच माखनचोर हॉटेलचे मालक संजय शिंदे यांचेतर्फे शाळेतील मुलांना नाश्ता व जेवणाची सोय करण्यात आली. पायल शेठ यांचेतर्फे मुलांना छान छान गोष्टींची पुस्तके देण्यात आली.

यावेळी व्हीआयएसच्या संपूर्ण समुहाच्या वतीने देवकुमार जाधव, गावाच्या वतीने गावचे पोलीस पाटील राजेंद्र महाले व ग्रामपंचायतीच्या वतीने सरंपच सुनिता कडाळे व ग्रामसेविका लीना साळुंखे यांनी आभार मानले. शाळेच्या वतीने देखील आभार व्यक्त करण्यात आले. ज्योती ठोंबरे, प्रिया गावित, मेघना राऊत, सचिन शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी मुख्याध्यापक पुष्पक शेवाळे, शिक्षिका ज्योती ठोंबरे, मंगला देवरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र घोरपडे, सरपंच सुनीता कडाळे, उपसरपंच गायत्री महाले, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शालेय समिती सदस्य, कंपनी समुह, पालकांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news