नाशिक : ‘एव्हिएशन विंग्स’ प्रदान सोहळ्यात जवानांची थरारक प्रात्यक्षिके

नाशिकरोड : गांधीनगर येथे बुधवारी कॉम्बॅट एव्हिएटर्स कोर्सच्या ‘एव्हिएशन विंग्स’ प्रदान सोहळ्याप्रसंगी प्रात्यक्षिके दाखविताना जवानांची टिपलेली छायाचित्रे. (छायाचित्रे : हेमंत घोरपडे)
नाशिकरोड : गांधीनगर येथे बुधवारी कॉम्बॅट एव्हिएटर्स कोर्सच्या ‘एव्हिएशन विंग्स’ प्रदान सोहळ्याप्रसंगी प्रात्यक्षिके दाखविताना जवानांची टिपलेली छायाचित्रे. (छायाचित्रे : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
भारतीय लष्कराने बदलत्या काळात अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रणांचा वापर करून स्वतःला बलशाली राष्ट्र बनविले आहे. ऊन, वारा, पाऊस तसेच रात्रीच्या वेळी अंधारात शत्र्रूशी युद्ध करण्याची क्षमता भारतीय लष्कराकडे आहे, असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल तथा महासंचालक, कर्नल कमांडंट आर्मी एव्हिएशन अजयकुमार सुरी यांनी केले.

गांधीनगर येथे बुधवारी (दि. 25) कॉम्बॅट एव्हिएटर्स कोर्सचा एव्हिएशन विंग्स प्रदान सोहळा पार पडला. यावेळी 37 अधिकार्‍यांनी कॉम्बॅट एव्हिएटर्स प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. सुरी यांच्या हस्ते खडतर प्रशिक्षण पूर्ण करणार्‍या अधिकार्‍यांचा गौरव झाला. नावीन्यपूर्ण अन् उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकार्‍यांना ट्रॉफी देण्यात आली. कॅप्टन आशिष कटारिया यांना एकूण गुणवत्तेत प्रथम स्थान मिळाल्याबद्दल 'सिल्व्हर चिता' ट्रॉफी आणि 'बेस्ट इन फ्लाइंग'साठी कॅप्टन एस. के. शर्मा ट्रॉफी देण्यात आली. कॅप्टन श्रवण मणिलथया पीएम यांना ग्राउंड विषयात प्रथम स्थान मिळाल्याबद्दल 'एअर ऑब्झर्व्हेशन पोस्ट – 35' ट्रॉफी प्रदान केली.

प्री आर्मी पायलट कोर्समध्ये प्रथम येण्यासाठी 'फ्लेडलिंग' ट्रॉफी कॅप्टन अभिलाषा बराक यांना देण्यात आली. 'कॅप्टन पीके गौर' 'ट्रॉफी फॉर बेस्ट इन गनरी' कॅप्टन आरके कश्यप यांना देण्यात आली. दरम्यान, आर्मी एव्हिएशन कॉर्प्सने 35 गौरवशाली वर्षे पूर्ण केली आहेत. 2019 मध्ये राष्ट्रपती श्रीरामनाथ कोविंद यांच्या हस्ते
प्रतिष्ठित राष्ट्रपतींचे 'कलर्स' प्रदान करण्यात
आले होते.

महिला पायलटला पहिल्यांदा 'एव्हिएशन विंग'


भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला हेलिकॉप्टर पायलटने प्रतिष्ठित एव्हिएशन विंग मिळवल्यामुळे आर्मी एवनसाठी हा एक महत्त्वाचा प्रसंग होता. लेफ्टनंट जनरल तथा महासंचालक आणि कर्नल कमांडंट आर्मी एव्हिएशन अजयकुमार सुरी यांच्या हस्ते महिला पायलटचा सन्मान करण्यात आला.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news