नाशिक : दुचाकी चोरी प्रकरणी तिघांना अटक

मालेगाव : कॅम्प पोलिसांनी जप्त केलेल्या चोरीच्या दुचाकी. समवेत अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी तेगबिरसिंग संधू, सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश काळे, प्रकाश पाटील आदी.
मालेगाव : कॅम्प पोलिसांनी जप्त केलेल्या चोरीच्या दुचाकी. समवेत अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी तेगबिरसिंग संधू, सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश काळे, प्रकाश पाटील आदी.

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा
कॅम्प पोलिसांनी सापळा रचून तिघा संशयितांना अटक करीत चोरीच्या 12 दुचाकी जप्त केल्या. या प्रकरणी कपील संजय मगरे (36, रा. पुष्पाताई हिरेनगर), मंगेश दिनेश पेठकर (28, रा. जाजूवाडी) व उमेश हसरत नागापुरे (38, रा. रामवाडी) यांना अटक करण्यात आली. त्यांनी हॅण्डललॉक बनावट चावीने उघडून दुचाकी पळविल्याची त्यांनी कबुली दिली.

पोलिसांनी मगरे या मुख्य संशयितावर पाळत ठेवून ही कारवाई यशस्वी केली. त्यांच्याकडून सोयगाव सबस्टेशन व निळगव्हाण शिवारातून चोरीला गेलेल्या दुचाकी जप्त केल्या.सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश काळे, प्रकाश पाटील, दीपक हेंबाडे, आनंदा गोंधळे, योगेश पवार, सिकंदर कोळी यांनी ही कारवाई केली.

बैलगाडीची दुचाकीला धडक
म्हाळदे शिवारातील बफातीपुराजवळ बैलगाडीने दुचाकीला धडक दिल्याने एक दुचाकीस्वार ठार, तर दोघे जखमी झाले. शनिवारी (दि. 11) सायंकाळी 7 ला हा अपघात झाला. वकार अहमद कलीम अहमद (22, रा. रसूलपुरा) याने पवारवाडी पोलिसांत फिर्याद दिली. तो त्याच्या भावासह दुचाकीने जात असताना म्हाळदे पुलाकडून म्हाळदे गावाकडे जाणार्‍या बैलगाडीने दुचाकीला धडक दिली. या धडकेत फिर्यादीचा भाऊ मोहंमद वसीम कलीम अहमद (27, रा. हिरापुरा) हा ठार झाला तर इतर जखमी झाले. या प्रकरणी खालीद (पूर्ण नाव माहीत नाही) याविरोधात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक डी. जे. बडगुजर अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news