नाशिक : उद्या या प्रभागात पाणीपुरवठा होणार नाही

पाणी पुरवठा बंद
पाणी पुरवठा बंद
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
म्हसरूळ आणि बोरगड जलकुंभास पाणीपुरवठा करणार्‍या ऊर्ध्ववाहिनीला पंचवटी जलशुध्दीकरण केंद्राजवळ आणि आरटीओ ऑफिसजवळ गळती लागली आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम तातडीने करणे आवश्यक असून, शनिवारी (दि. 7) काम हाती घेण्यात येणार असल्याने म्हसरूळ व बोरगड जलकुंभातून होणारा प्रभाग क्र. 1 आणि प्रभाग क्र. 6 मध्ये पाणीपुरवठा होणार नाही.

प्रभाग क्रमांक 1 मधील ओंकारनगर, वृंदावननगर, प्रभातनगर, दिंडोरी रोड राणा हॉटेलपर्यंत, म्हसरूळ – मखमलाबाद लिंकरोडवरील पूर्ण परिसर, ओमनगर, गणेशनगर, स्नेहनगर, गुलमोहरनगर, शनिमंदिर परिसर, म्हसरूळ गावठाण, संभाजीनगर, बोरगड आश्रमशाळेजवळील परिसर, आदर्शनगर, एकतानगर, प्रभातनगर परिसर, पेठ रोड, जकात नाका, वेदनगरी, उज्ज्वलनगर तसेच प्रभाग क्रमांक 6 मधील कल्याणी व राजेय सोसायटी, मेहेरधाम, गॅस गोदाम, इंद्रप्रस्थ सोसायटी, पेठ रोड, जकात नाका परिसर, नमन हॉटेल परिसर, संत सावतानगर, डीटीपीनगर परिसरात शनिवारी (दि.7) दुपारचा आणि सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. रविवारी (दि.8) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी नोंद घेऊन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश निकम यांनी केले आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news