नाशिक : सातपूरला मनपा उद्यानातील चंदनाच्या तीन झाडांची चोरी

सातपूर : गणेशनगरच्या मनपा उद्यानातील चंदनाच्या झाडांचा  चोरट्यांनी कापून नेलेला बुंधा. (छाया : कमलाकर तिवडे)
सातपूर : गणेशनगरच्या मनपा उद्यानातील चंदनाच्या झाडांचा चोरट्यांनी कापून नेलेला बुंधा. (छाया : कमलाकर तिवडे)
Published on
Updated on

सातपूर : पुढारी वृत्तसेवा

सातपूर औद्योगिक वसाहतीजवळील गणेशनगरातील मनपाच्या गणेश उद्यानातील चंदनाची तीन मोठी झाडे चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्रीनंतर तोडून त्यातील बुंधे घेऊन गेले. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पावन गणेश उद्यानात मध्यरात्री चंदनाच्या तीन झाडाचा बुंधा अत्याधुनिक कटरने कापून त्यातील सुवासिक गाभा काढून नेला आहे. सातपूर भागात चंदन चोरीच्या घटना सुरूच आहेत. पोस्ट ऑफिसमधील दोन चंदनाचे, सातपूर कॉलनी सार्वजनिक उद्यान, कंपन्या, बंगले या ठिकाणांहून चंदन झाडाच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. दोन जुलै रोजी समतानगर येथून घरासमोरील गेटजवळ असलेले चंदनाचे झाड मध्यरात्री तोडून नेताना रहिवासी जागे झाले असता त्यांना चोरट्यांनी कटर दाखवत बुंधा कापून नेला होता.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news