नाशिक : मनपाला नोकरभरतीसाठी पस्तीस टक्के आस्थापना खर्चाची अट शिथिल

नाशिक : मनपाला नोकरभरतीसाठी पस्तीस टक्के आस्थापना खर्चाची अट शिथिल

नाशिक : मनपाचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्यामुळे सुमारे २४ वर्षांपासून नोकरभरतीत येत असलेले अडथळे राज्य शासनाच्या नगरविकास खात्याच्या नवीन आदेशामुळे दूर झाले आहेत. ही अट स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त राज्यात होणाऱ्या ७५ हजार पदांच्या नोकरभरतीसाठी अट वगळण्यात आली आहे.

मनपाच्या आस्थापनेत ७०८४ जागा आहेत. गेल्या 20 वर्षांमध्ये नोकरभरती न झाल्यामुळे जवळपास अडीच हजार पदे रिक्त झाली आहेत. महापालिकेचा आस्थापना खर्च ३५ टक्के यापेक्षा अधिक असल्यामुळे नोकरभरती करता येत नाही. दरम्यान, राज्य शासनाने ११ जानेवारी २०२३ रोजी महापालिकांना अत्यावश्यक सेवेतील व गरजेचे असलेले अग्निशमन, वैद्यकीय सेवा, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन सेवा या स्वरूपाची पदे भरण्यास मान्यता दिली आहे. मात्र, आस्थापना खर्चाची अट कायम असल्यामुळे नोकरभरती करता येत नव्हती. ही बाब लक्षात घेता पस्तीस टक्के आस्थापना खर्चाची अट एकवेळची बाब म्हणून शिथिल करण्यात आले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news