नाशिक : ‘टीईटीधारक’ 27 सप्टेंबरला मंत्रालयावर धडकणार

टीइटी www.pudhari.news
टीइटी www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ऑगस्टमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने बोगस शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी प्रमाणपत्र मिळविणार्‍या राज्यभरातील 7 हजार 800 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. तेव्हापासून राज्यभर टीईटी प्रमाणपत्र घोटाळा गाजत आहे. त्यातच आता युवा शाही संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यातील 'टीईटी'पात्रता धारक उमेदवारांकडून आपल्या मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 27 सप्टेंबरला मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

राज्यात कंत्राटी जे शिक्षक आहेत त्यांना सेवेत समाविष्ट न करता सर्व शिक्षकांची पदे ही पवित्र पोर्टलमार्फत भरण्यात यावी. त्यांना टीईटी, सीटीईटी, टेट या परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करावे. सन 2017 ची रखडलेली उर्वरित शिक्षक भरती पूर्ण करावी. 'टीईटी' घोटाळ्यातील बोगस शिक्षक व अधिकारी यांना बडतर्फ करून तत्काळ कडक कारवाई करण्यात यावी. एजंटची नावे जाहीर करून कारवाई करण्यात यावी. सन 2013 पासूनच्या 'टीईटी' पात्र उमेदवारांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात यावी. बोगस शिक्षकांच्या रिक्त जागा दुसर्‍या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेमधून भरण्यात याव्यात आदी संघटनेच्या मागण्या आहेत. 2018 – 19 मध्ये आश्रमशाळांतील शिक्षक भरतीतील गैरप्रकारांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. राज्यात सर्व विभागात, माध्यमात जी शिक्षक भरती होती त्यांना एक नियमात करण्यात यावे. शिक्षकांना 31 मार्च 2019 पर्यंत 'टीईटी' उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत दिली होती. या मुदतीत प्रमाणपत्र सादर न करणार्‍या शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्याची कारवाईही झाली पाहिजे आदी मागण्या संघटनेकडून करण्यात आल्या आहेत. यावेळी अश्विनी कडू, तुषार देशमुख, विजय पाटील, चतुरसिंग सोळंके, तुषार शेटे, रामधन ठोंबरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news