नाशिक :कर्मवीरांचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवा : ॲड. नितीन ठाकरे

निफाड : परिवर्तन पॅनलच्या प्रचार मेळाव्यात बोलताना ॲड. नितीन ठाकरे. समवेत इतर मान्यवर.
निफाड : परिवर्तन पॅनलच्या प्रचार मेळाव्यात बोलताना ॲड. नितीन ठाकरे. समवेत इतर मान्यवर.
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मराठा समाजाच्या कर्मवीरांनी बहुजन समाजासाठी 'मविप्र'ची स्थापना केली होती. मात्र, एका परिवाराकडून ही संस्था आपण उभी केल्याचा आव आणला जातो. या संस्थेचा लाभ बहुजन समाजाला मिळण्याऐवजी संबंधित परिवारानेच घेतला आहे. खाजगीकरणाकडे जाणारी संस्था रोखण्यासाठी तसेच कर्मवीरांचा अपमान करणाऱ्यांना मतदानातून धडा शिकविण्याचे आवाहन परिवर्तन पॅनलचे नेते ॲड. नितीन ठाकरे यांनी केले.

निफाड येथे पार पडलेल्या परिवर्तन पॅनलच्या प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, बाळासाहेब क्षीरसागर, बापूसाहेब मोगल, अरविंद कारे, माजी आमदार कल्याणराव पाटील, नानासाहेब बोरस्ते, डी. बी. मोगल, विश्वास मोरे, शिवाजी गडाख, शोभा बोरस्ते, लक्ष्मण लांडगे, नंदकुमार बनकर, कृष्णाजी भगत, रमेश पिंगळे, संदीप गुळवे, प्रा. नानासाहेब दाते, मदन पवार, रवींद्र देवरे, प्रवीण जाधव, यतीन कदम आदी उपस्थित होते. सभासद पालकाकडे पैसा नसतांनाही त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर देणग्या घेऊन त्यांना शिक्षणापासून वंचित करण्याचा प्रयत्न सातत्याने घटनाबाह्य 'तीन' सरचिटणीसांनी केला आहे. त्यामुळे संस्थेत सध्या झालेले सत्तेचे एककल्ली केंद्रीकरण हे हुकूमशाहीकडे निघाले आहे. संस्था लोकशाही पद्धतीप्रमाणे चालणे अपेक्षित असते. संस्था दादा-ताईंच्या ताब्यातून सर्वसामान्य सभासदांकडे गेली पाहिजे, असे ॲड. नितीन ठाकरे यांनी सांगितले. निफाड तालुक्यातील कसबे-सुकेणे, चांदोरी, चितेगाव, शिंगवे, सोनगाव, करंजगाव, पिंपळस, कोठूरे, खेडलेझुंगे येथे परिवर्तन पॅनलच्या सभासदांचे मेळावे संपन्न झाले. यावेळी माधवराव मोगल, बाजीराव भंडारे, लक्ष्मण भंडारे, विष्णुपंत उगले, गोपाळराव भंडारे, शंकरराव झांबरे, सुभाष गाडे, गणपत गाडे, बाळासाहेब देशमुख, सचिन मोगल, मोहन टर्ले, अमृता टर्ले, शिवाजी ठालकर आदी उपस्थित होते.

कर्मवीरांना निवडणुकीत गोवणे चुकीचे : ॲड. कोकाटे

केटीएचएम महाविद्यालयाच्या जागेवर प्रगती पॅनलकडून चुकीची माहिती दिली जात आहे. वास्तविक, निवडणुकीत कर्मवीरांना गोवायलाच नको होते. त्यांच्या त्यागाची बरोबरी करणारा संस्थेत अजून जन्माला आलेला नाही. 'परिवर्तन पॅनल'ला मतदान करून पवार परिवाराची मविप्र संस्थेतील मक्तेदारी दूर करून टाका. संस्थापकांना वादाच्या भोवऱ्यात ओढणाऱ्यांना सभासद कधीही माफ करणार नाही, असे आमदार ॲड. माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news