नाशिक : पाय जखमी होऊन सात वर्षीय बालकाचा संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांचा ठिय्या

नाशिक : पाय जखमी होऊन सात वर्षीय बालकाचा संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांचा ठिय्या

Published on
नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
लोखंडी गेट पायावर पडल्याने पायाला जखम होऊन सात वर्षीय बालकाला हिरावाडी रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यानंतर सोमवारी (दि १७) बालकाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी केलेल्या उपचारात हलगर्जी व इंजेक्शनचा ओव्हरडोस दिल्यानेच मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याची माहिती समोर आली आहे.
सविस्तर माहिती अशी की, पंचवटी परिसरात एका बंगल्याच्या वॉचमनचा सात वर्षीय मुलगा दोन दिवसांपूर्वी बंगल्यात खेळतांना त्याच्या पायावर लोखंडी गेट पडल्याने तो जखमी झाला. त्यामुळे तातडीने हिरावाडी रोडवरील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल बालकाला दाखल केले होते. मात्र त्याची प्रकृती गंभीर झाल्याने  पंचवटी येथीलच एका बड्या खासगी रुग्णालयात त्वरीत दाखल केले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेनंतर बालकाच्या नातेवाईकांनी खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन गोंधळ घालत उपचारात इंजेक्शनचा ओव्हर डोस देत हलगर्जीपणा झाल्यानेच मुलाचा जीव गेल्याचा आरोप केला. हॉस्पिटलसमोर नागरिकांचा मोठा जमाव जमल्याने तणावाचे वातावरण पसरले होते. उपचार करणाऱ्या संबंधित डॉक्टरवर कारवाईची मागणीही करण्यात आली. परंतु काही राजकीय हस्तक्षेपामुळे हे प्रकरण मिटविण्यासाठीचे प्रयत्न सुरू होते. दुसरीकडे, याप्रकरणी पोलिसांतही रात्री उशिरापर्यंत कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल झालेली नव्हती. माञ सोमवारी (दि १७) मध्यरात्रीपर्यंत रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने नातेवाईकांनी ठिय्या मांडला होता.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news