नाशिक : विद्यार्थिनींची धावत्या रिक्षातून उडी; एकीचा मृत्यू दुसरी गंभीर जखमी

सिन्नर : खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेली सायली आव्हाड.
सिन्नर : खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेली सायली आव्हाड.

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडावंदन करून शालेय निकालाची गुणपत्रिका घेण्यासाठी डुबेरे येथील विद्यालयात गेलेल्या विद्यार्थिनींनी धावत्या रिक्षातून उडी मारल्याने एकीचा मृत्यू तर दुसरी गंभीर जखमी झाली आहे. सिन्नर-ठाणगाव मार्गावर आटकवडे शिवारात रविवारी (दि.१) सकाळच्या सुमारास ही घटना घडली.

डुबेरे येथील विद्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडावंदन कार्यक्रमाकरीता इयत्ता दहावीतली गायत्री अशोक चकणे (१४, रा. वडगाव पिंगळा. हल्ली मुक्काम आटकवडे, ता. सिन्नर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून पाचवीत शिकणारी सायली भगवान आव्हाड (११, रा. आटकवडे, ता. सिन्नर) या शाळेत गेल्या होत्या. विद्यालयातून घरी परतत असताना त्यांनी कोंबडी विक्री करणा-या व सिन्नरकडे जाणाऱ्या समीर शेख नावाच्या इसमाच्या ॲपे रिक्षात पाठीमागे बसल्या. मात्र, रिक्षा आटकवडे शिवारात आली असता रिक्षाचालक विद्यार्थिनींना निश्चित स्थळी उतरवण्याचे विसरला. त्यामुळे रीक्षातील मुलींनी हाका मारून रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, वाहनचालकाला मुलींचा आवाज ऐकू आला नसल्याने घाबरलेल्या दोघींनी चालत्या रिक्षातून उडी मारली. इतर वाहनचालकांनी रिक्षाचालकाच्या ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर त्याला हे समजले. जखमी विद्यार्थिनीला खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. गायत्रीच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी गायत्रीचे मामा ज्ञानेश्वर वाघ यांच्या फिर्यादीवरुन रिक्षाचालक समीर अहमद शेख (रा. डुबेरे, ता. सिन्नर) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून सिन्नर पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.

मामा करीत होते गायत्रीचा सांभाळ…

गायत्री ही मूळची वडगाव पिंगळा येथील रहिवाशी असून काही वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले होते. तेव्हापासून आटकवडे येथील मामा ज्ञानेश्वर वाघ तिचा सांभाळ करीत होते. डुबेरे येथील जनता विद्यालयात शिक्षण घेणारी गायत्री उत्तम गुणांनी उत्तीर्ण होत नुकतीच दहावीत गेली होती. तिच्या मृत्यूने आटकवडे परिसरासह वडगाव पिंगळा येथे शोककळा पसरली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news