नाशिक : जाती-धर्मात तेढ निर्माण करणार्‍या शक्तिविरोधात बळ दे : डॉ. गोर्‍हे

रंगमहालाच्या डागडुजीसाठी मंजुर निधी मंदिराकडे वर्ग करण्याबाबत कार्यवाहीचे निर्देश देतांना डॉ. निलम गो-हे.  समवेत उपस्थित सुभाष पवार, जेहलम जोशी, तहसीलदार प्रदीप पाटील, ओम बाहेती, भारती जाधव. 
रंगमहालाच्या डागडुजीसाठी मंजुर निधी मंदिराकडे वर्ग करण्याबाबत कार्यवाहीचे निर्देश देतांना डॉ. निलम गो-हे.  समवेत उपस्थित सुभाष पवार, जेहलम जोशी, तहसीलदार प्रदीप पाटील, ओम बाहेती, भारती जाधव. 

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा : जाती-धर्माच्या आधारावर तेढ निर्माण करणार्‍या शक्तींना जनता जनार्दनापासून दूर ठेवा. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्य चालविण्यासाठी शक्ती दे, असे साकडे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी चांदवडच्या रेणुकादेवीला घातले.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. गोर्‍हे यांनी चांदवड येथील रेणुकामातेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्या म्हणाल्या, चांदवड येथील मंदिर परिसरात असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या रंगमहालाच्या डागडुजी आणि दुरुस्तीसाठी पर्यटन विभागाने पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी त्वरित मंदिराकडे वर्ग करण्याबाबत जिल्हास्तरावरून त्वरित कार्यवाहीविषयीचे निर्देश डॉ. गोर्‍हे यांनी अधिकार्‍यांना दिले. यावेळी सुभाष पवार, जेहलम जोशी, तहसीलदार प्रदीप पाटील, ओम बाहेती, भारती जाधव उपस्थित होत्या.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news