नाशिक : सोशल मीडियाची कमाल, चोरीला गेलेली पिकअप २४ तासांत सापडली

नाशिक : सोशल मीडियाची कमाल, चोरीला गेलेली पिकअप २४ तासांत सापडली

Published on

दिंडोरी  (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

शहरातील शिवाजीनगर भागातून चोरीस गेलेली पिकअप पोलिस व जागरूक नागरिक यांच्या समन्वयाने अवघ्या २४ तासांत सापडल्याने सर्वांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दिंडोरी शहरातील धनगरवाडा येथे राहणारे भास्कर दिनकर जाधव यांचे महिंद्रा पिकअप वाहन (क्र. एमएच १५ सीके ७६६९) शनिवार दि. ४ मार्च रोजी रात्री १० वाजता शिवाजीनगर येथील क्षीरसागर हॉस्पिटलजवळ पार्क केली होती. रविवारी सकाळी चार वाजता भास्कर जाधव द्राक्ष भरण्यासाठी जाणार असताना त्यांनी गाडी पार्क केलेल्या ठिकाणी बघितले असता गाडी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे त्यांना समजले. त्यांनी तत्काळ दिंडोरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी संपर्क केला. दिवसभर गाडी कुठे सापडते काय, याबाबत शोध घेतला. महिंद्रा पिकअप वाहन दिंडोरीतून चोरी गेल्याची पोस्ट विविध व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवण्यात आली. तसेच पोलिसांनी वायरलेसद्वारे घटनेची माहिती सर्वत्र पोहोचवली. तीच पोस्ट कळवण तालुक्यातील नाकोडे ग्रामस्थ सचिन गुंजाळ व समाधान गांगुर्डे यांनी पाहिली होती. त्यांनी चोरीला गेलेल्या गाडीचा क्रमांक पाहिला असता ती गाडी शनिवारी सायंकाळी आठ वाजता कळवण येथील एकलहरा रोडवर असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत दिंडोरी येथील प्रदीप रावसाहेब पवार व विनोद परदेशी यांना दूरध्वनी करून माहिती दिली. दिंडोरी पोलिस ठाण्याचे कर्मचारी बाळकृष्ण पजई यांना याबाबत माहिती दिली असता त्यांनी गुंजाळ, गांगुर्डे यांना गाडीचा पाठलाग करण्याची विनंती केली. त्यावरून दोघांनी दुचाकीद्वारे पिकअपचा सिनेस्टाइल पाठलाग केला.

चोरट्याने ती गाडी एकलहरा रोड येथे सोडून पलायन केले, अशी माहिती त्या दोघांनी दिंडोरी पोलिसांना कळवली. दिंडोरी पोलिस व गाडीमालक यांनी घटनास्थळी धाव घेत वाहन ताब्यात घेतले. संबंधित दोघा जागरूक नागरिकांच्या या कामगिरीबद्दल पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news