पिंपरी : तळेगाव स्टेशन परिसरात धुलवडीचा जोश | पुढारी

पिंपरी : तळेगाव स्टेशन परिसरात धुलवडीचा जोश

तळेगाव स्टेशन :  पुढारी वृत्तसेवा : तळेगाव स्टेशन परिसरात वतन नगर,स्वराज नगरी,वीज कर्मचारी वसाहत, इंद्रायणी वसाहत,आनंद नगर, वनश्री नगर , जोशी वाडी, यशवंत नगर, मनोहर नगर, फलके वाडी आदी ठिकाणी इमारतींच्या पार्किंग मध्ये टेरेसवर धुलवड उत्साहात रंगीतमय, संगीतमय साजरी होत असून तरुणाई मध्ये रंग खेळण्याचा जोशआणि दांडगा उत्साह दिसून येत आहे.

संगीताच्या आणि गाण्याच्या तालावर तरुण, महिला, मुले, मुली, बालके धुलवडीचा मनमुराद आनंद घेत आहेत. एकमेकांना रंग लावत आहेत. मुले एकमेकांच्या अंगावर रंग टाकून, तोंडाला रंग लावून रस्त्यावर फिरत होते. परिसरात धुलवडमुळे रंगीत वातावरण झाले आहे. कोठेही हुल्लडबाजी नसून खेळीमेळीचे वातावरण आहे.

Back to top button