नाशिक : सिन्नरला सर्पमित्राचा स्टंटबाजीत नागाच्या दंशाने मृत्यू

नाशिक : सिन्नरला सर्पमित्राचा स्टंटबाजीत नागाच्या दंशाने मृत्यू

नाशिक (सिन्नर): पुढारी वृत्तसेवा

शहरातील सर्पमित्राचा पकडलेल्या कोब्रा जातीच्या नागाबरोबर स्टंट करत असताना ओठांना दंश केल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.11) सायंकाळी 6 च्या सुमारास घडली. नागेश श्रीधर भालेराव (32) असे मृत सर्पमित्राचे नाव आहे. नागेश भालेराव हा शहरातील वेल्डिंग वर्कशॉपमध्ये तसेच होर्डिंग चिकटवण्याचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. शुक्रवारी एका ठिकाणी पकडलेला कोब्रा जातीचा नाग त्याने सिन्नर महाविद्यालयासमोरील मित्राच्या कॅफेमध्ये आणला. कॅफेच्या वरती बिल्डिंगच्या गच्चीवर जात नागेश याने मित्रांसमोर नागाचे चुंबन घेण्याच्या प्रयत्न केला. नागाने त्याच्या ओठांना दंश केला. त्याच्या मित्रांंनी त्यास उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. शनिवारी (दि.12) शवविच्छेदन करून मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आला. सकाळी 11 च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news