नाशिक : ‘सिडको’विरोधातील सत्याग्रह आंदोलन स्थगित

सिडको : प्रशासक कांचन बोधले यांना निवेदन देताना आ. सीमा हिरे. समवेत छाया देवांग, गणेश पवार, काशीनाथ दिंडे, नंदन खरे, जान्हवी बिरारी, दशरथ गांगुर्डे, देवेंद्र पाटील, दिलीप देवांग, विक्रम नागरे आदी.
सिडको : प्रशासक कांचन बोधले यांना निवेदन देताना आ. सीमा हिरे. समवेत छाया देवांग, गणेश पवार, काशीनाथ दिंडे, नंदन खरे, जान्हवी बिरारी, दशरथ गांगुर्डे, देवेंद्र पाटील, दिलीप देवांग, विक्रम नागरे आदी.

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा : सिडको प्रशासनाने घर हस्तांतरण शुल्क व पहिला मजला विस्तारित शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव मुंबई येथील वरिष्ठ कार्यालयात पाठविण्याचे आश्वासन प्रशासक कांचन बोधले यांनी दिल्याने नागरिक संघर्ष समितीचे सत्याग्रह आंदोलन एक महिन्यासाठी स्थगित केले. तसेच प्रशासनाने सिडकोतील नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात या मागणीचे निवेदन आ. सीमा हिरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिले.

सिडकोतील घर हस्तांतरण शुल्क व पहिला मजला विस्तारित शुल्क कमी करणे यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि.19) सिडको कार्यालयासमोर नागरिक संघर्ष समितीने सत्याग्रह आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु सिडको प्रशासनाने सोमवारी (दि.18) समितीच्या पदाधिकार्‍यांसमवेत चर्चा करून मागण्यांचा प्रस्ताव तातडीने मुंबई कार्यालयाला सादर करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे नागरिक संघर्ष समितीने सत्याग्रह आंदोलन एक महिन्यासाठी स्थगितीची घोषणा केली. यानंतर मंगळवारी सकाळी 11 वाजता परत सिडको कार्यालयात आ. सीमा हिरे, माजी नगरसेविका छाया देवांग, संघर्ष समितीचे प्रमुख गणेश पवार, काशीनाथ दिंडे, नंदन खरे, जान्हवी बिरारी, दशरथ गांगुर्डे, देवेंद्र पाटील, दिलीप देवांग, विक्रम नागरे आदींनी सिडको कार्यालयात फेरआढावा घेतला. एक महिन्यात या मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही झाली नाही, तर पुढील दिशा ठरवून आंदोलन करण्यात येणार आहे.

सिडको प्रशासनाने कोरोनात कोणत्याही शुल्कात वाढ केली नाही. तसेच सिडकोतील घर हस्तांतरण शुल्क कमी करावे. पहिला मजला विस्तारित शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव मुंबई येथील सिडकोच्या मुख्य कार्यालयात पाठविला जाणार आहे. – कांचन बोधले, प्रशासक, सिडको कार्यालय

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news