नाशिक : मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून करून त्यांच्या कारसह मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कारागृहात असलेल्या संशयित संदीप वाजे व बाळासाहेब म्हस्के यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे दोघांचाही कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
पोलिसांनी तपास करून यशवंत ऊर्फ बाळासाहेब रामचंद्र म्हस्के यास अटक केली. दोघांच्या तपासात डॉ. वाजे यांच्या खुनाचा उलगडा झाला. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर दोघांचीही रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. तेथून म्हस्के याने जामिनासाठी अर्ज केला. सरकारी पक्षातर्फे अॅड. रेश्मा जाधव यांनी युक्तिवाद केला.