बेळगाव : चोर्‍या अन् घरफोड्या ; सात जणांना बेड्या | पुढारी

बेळगाव : चोर्‍या अन् घरफोड्या ; सात जणांना बेड्या

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
चोर्‍या आणि घरफोड्यांप्रकरणी बेळगाव पोलिसांनी मंगळवारी एकूण सात जणांना अटक केली आहे. मारिहाळ पोलिसांनी तिघांना तर हिरेबागेवाडी पोलिसांनी चौघांना अटक केली. सात जणांमध्ये तिघे युवक धामण्याचे, तर चौघे युवक तारिहाळ गावचे आहेत.
मारिहाळ पोलिस स्थानकाच्या व्याप्तीत येणार्‍या शिंदोळी नगर येथे झालेल्या चोरी प्रकरणाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी धामणे येथील तिघा तरुणांना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घटनेची नोंद मारिहाळ पोलिसांत झाली आहे.

सुनील कुम्माणी बेळगावकर (वय 22), लक्ष्मण नारायण बाळेकुंद्री (वय 25), केतन केशव पाटील (वय 22, तिघेही रा. धामणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यांच्याकडून वाहनासह बांधकाम कामासाठी वापरले जाणारे साहित्य असा 4 लाख 65 हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ग्रामीणचे एसीपी गणपती गुडाजी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एम. के. बसापूर यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणांचा तपास करून चोरट्यांना अटक करण्यात आली. कारवाईत पोलिस उपनिरीक्षक एल. जी. करीगौडर, एस. सी. गौरी, बी. एस. नायक, बी. बी. कड्डी आदींनी भाग घेतला.

तारिहाळच्या चौघांना अटक

हिरेबागेवाडी व्याप्तीत झालेल्या चोर्‍यांचा तपास लावण्यात हिरेबागेवाडी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी तारिहाळ येथील चौघांना अटक करून त्यांच्याकडून सोने-चांदी, रक्कम असा 14 लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नागेंद्र उर्फ स्वामी तिपण्णा कोळीकोप्प (वय 23), जोतिबा उर्फ अंजू उर्फ अजय आपय्या तिप्पाई (वय 27), महेश प्रकाश खनगावकर (वय 21), मंजुनाथ आपय्या कोलेकर (वय 21, चौघेही रा. तारिहाळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. निरीक्षक सुनीलकुमार शिन्नूर यांच्या नेतृत्वाखाली कारवाईत पोलिस उपनिरीक्षक बी. आर. मुत्नाळ, वाय. बी. हत्तरवाट, ए. के. कांबळे, एस. भावी, जे. ए. पाटील आर. एस. करगीनमनी आदींनी भाग घेतला.

Back to top button