कोकण रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, निर्बंध शिथील करण्‍याबाबत महत्त्‍वाचा निर्णय | पुढारी

कोकण रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, निर्बंध शिथील करण्‍याबाबत महत्त्‍वाचा निर्णय

पणजी : पुढारी वृत्तसेवा कोकण रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. देशभरात कोरोना स्थिती आटोक्यात आल्याने भारतीय रेल्वे मंत्रालयाने रेल्वे प्रवासातील निर्बंध शिथील केले आहेत. रेल्वे मंत्रालयाने लांबच्या पल्ल्यांच्या प्रवासासाठी जनरल तिकीट विक्रीही सुरू केली आहे.

कोकण रेल्वेतून दरदिवशी ४८ गाड्या सोडल्या जातात. त्यातून दरदिवशी सुमारे ८० हजार लोक प्रवास करतात. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या नव्या निर्देशानुसार कोकण रेल्वे लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून शनयकक्षात बेडिंगची सुविधा पूर्ववत उपलब्ध करून देणार आहे.

यापूर्वी रेल्वेकडून वातानुकुलित डब्यातील प्रवाशांना बेडिंगची सुविधा पुरविण्यात येत होती. बेडिंगची सुविधेंतर्गत उशी, बेडसीट आणि ब्लँकेट रेल्वेकडून पुरविण्यात येत होते. मात्र, कोरोना संसर्ग वाढल्यामुळे २०२० मध्ये रेल्वे मंत्रालयाने ही सुविधा पुरविणे बंद केले होते. ही सुविधा पूर्ववत करण्यात येत असल्याने त्याचा लाभ कोकण रेल्वेतून प्रवास करणार्‍या प्रवाशांनाही होणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाडगे यांनी दिली.

हेही वाचलंत का? 

Back to top button