नाशिक : राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेत राशी जहागीरदार, पावन गोयल विजयी

नाशिक : राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंनी चषक प्रदान करताना मान्यवर.
नाशिक : राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंनी चषक प्रदान करताना मान्यवर.
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्य व जिल्हा ब्रीज असोसिएशन आणि ब्रीज फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेत १६ वर्षे वयोगगटात आंतरराष्ट्रीय खेळाडू राशी जहागीरदार आणि पावन गोयल यांनी आयएमपी पेयर्स प्रकारात सुंदर खेळ करून सुवर्णपदक प्राप्त केले. तर २१ वर्षे आणि २६ वर्षे या गटात स्विस पेयर्स प्रकारात शुभश्री बसू आणि सोमण सरकार या जोडीने सुवर्णपदक मिळविले.

राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, पाँडिचरी, गुजरात, हरियाणा, जम्मू-काश्मीर, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, कर्नाटक आदी १४ राज्यांतील ७६ खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेच्या ३१ वर्ष गटात स्विस पेयर्स प्रकारात सायंतन कुशारी आणि सागणिक रॉय यांनी प्रथमपासून आघाडी घेत सुवर्णपदक मिळविले. २६ वर्ष गटात आयएमपी पेयर्स प्रकारात आंतरराष्ट्रीय खेळाडू विद्या पटेल आणि कल्पना गुर्जर यांनी आपल्या दर्जाला साजेशा खेळ करून सुवर्णपदक पटकावले. स्पर्धेच्या १६ वर्ष गटात आयएमपी पेयर्स प्रकारात तीर्थराज चौधरी आणि नचिकेत मुथूस्वामी या जोडीने सुवर्णपदक मिळविले. २६ वर्ष वयोगटात मॅच पॉइंट पेयर्स प्रकारात ज्योत्स्ना आणि शॉन जोसेफ यांनी सुवर्णपदक मिळविले. विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी के. पी. मथुर, हेमंत पांडे, भालचंद्र दक्षिणदास, प्रशिक्षक अनिरुद्ध सांझगिरी आदी उपस्थित होते. स्पर्धाप्रमुख भालचंद्र दक्षिणदास व चेतन रावल यांच्या सहकाऱ्यांनी तांत्रिक बाजू सांभाळली.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news