तंत्र शिक्षण संचालनालयाकडून डी. फार्मसी प्रवेशासाठी मुदतवाढ | पुढारी

तंत्र शिक्षण संचालनालयाकडून डी. फार्मसी प्रवेशासाठी मुदतवाढ

पुढारी ऑनलाइन डेस्‍क : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील प्रथम वर्ष औषधनिर्माण शास्त्र पदविका (डी. फार्मसी) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई यांच्याकडून १० जानेवारी २०२३ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. तरी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतून वंचित राहिलेले व संस्था स्तरावरील जागेसाठी प्रवेशास पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सदर संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कुर्तडीचे प्राचार्य यांनी केले आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत डी. फार्मसी प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. औषधनिर्माणशास्त्र शाखेतून ज्‍या विद्यार्थांना करिअर करावयाचे आहे असे विद्यार्थी या अभ्यासक्रमाला पसंती देतात. दरवर्षी उपलब्ध जागांपेक्षा दुप्पट प्रवेश अर्ज दाखल होत आहेत.

परंतु शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये या अभ्‍यासक्रमाच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाले आहे अशी शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. डी. फार्मसीच्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ठप्प झाल्याने नोंदणीकृत विद्यार्थी मात्र अन्य पर्याय पाहत आहेत. दरम्‍यान आता नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

हेही वाचा 

Back to top button